Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुरा मध्ये स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नाला व गटार साफसफाईचे कामे ठप्प नागरिकांनी स्वखर्चाने केली नाल्यांची सफाई नगर परिषद कर वसूल करणे व करावर दंड आकारण्या पुरतीच मर्यादित आमचा व...

नाला व गटार साफसफाईचे कामे ठप्प
नागरिकांनी स्वखर्चाने केली नाल्यांची सफाई
नगर परिषद कर वसूल करणे व करावर दंड आकारण्या पुरतीच मर्यादित
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ३१ मे २०२४) -
        मानसून पूर्व शहरात नाली - नाले सफाई होणे गरजेचे असताना नेहमीप्रमाणे बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईचे भोग शहरातील जनतेला भोगावे लागणार आहेत. येथील अनेक वॉर्डातील तसेच गडचांदूर मार्गावरील नाली गाळ, प्लास्टिक व कचऱ्यामुळे तुडुंब बुजून गेले आहेत. काही भागात केवळ सहज दृष्टीला पडतील असेच नाल्या केवळ थातूरमातूर पद्धतीने साफ केलेली आहेत. गडचांदूर मार्गावरील नाल्यात थोडाही पाऊस पडला की नाल्यातील पाणी घरात, दुकानांत शिरत आहे. पावसाळ्यापूर्वी नाल्याची स्वच्छता होणे गरजेचे असताना नगर परिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असताना गडचांदूर मार्गावरील जागृत नागरिकांनी स्वखर्चाने नाल्यांची साफ सफाई करवून घेतली मात्र तीन दिवस उलटले तरी नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी काढलेला मलबा उचलण्यास तयार नाही. गडचांदूर - राजुरा महामार्गावरील नाल्यातून काढलेला हा कचरा राजुरा मध्ये "स्वच्छ भारत अभियाना"चा फज्जा उडवत आहे. आता काय नगर परिषद कर वसूल करणे व करावर दंड आकारण्या पुरतीच मर्यादित राहिली काय असा प्रश्न नागरिक विचारात आहे. याबाबत "आमचा विदर्भ" ने पुढाकार घेत ट्विट केले असून ट्विट ला स्वच्छ भारत अभियानाला ही टॅग केले आहे.  

        देशपांडे वाडी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकाचे गतवर्षी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते उदघाटन झाले होते. गुरुदेव सेवा मंडळाच्या  सदस्यांनी परिसर स्वच्छ केला होता. जेसीबी लावून नाली सुद्धा साफ करण्यात आली होती मात्र एक वर्षांपासून अधिक काळ उलटला तरी नाल्यातून काढलेला गाळाचे ढीग आजही जैसे थे आहे. हा गाळ व कचरा त्वरित न उचलल्यास पावसामुळे पुन्हा नाल्यात जाऊन परिस्थिती 'जैसे थे' होणार आहे.       

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #DrainsDrainsinEastMonsoonCity #Irresponsibleofficers #Thewaterfromthedrainisenteringthehousesandshops #muncipalcouncilrajura #CityCouncilRajura #SwachhBharatAbhiyan #Municipalcouncilsarelimitedtocollectionoftaxandimpositionofpenaltyontax #RashtrasantTukdojiMaharajChowk #subhashdhote #GurudevSevaMandal

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top