Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: महामानवाच्या १३३व्या जयंती दिनानिमित्त ३६ रक्तदात्यांनी रक्तदान करून वाहिली आदरांजली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजुरा (दि. १७ एप्रिल २०२४) -         सलग ५ वर्षांपासून सातत्याने वर्षातून २ वेळा महापुरुषांना आदरांजली म्हणुन रक्...

आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. १७ एप्रिल २०२४) -
        सलग ५ वर्षांपासून सातत्याने वर्षातून २ वेळा महापुरुषांना आदरांजली म्हणुन रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक कार्यात नेहमी हिरीरीने भाग घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासणारा सामाजिक कार्यकर्ता अमोल राऊत व त्यांच्या नागवंश युथ फोर्स बहुउद्देशिय संस्था राजुरा यांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा विश्वभूषण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्ताने रक्तानुबंध जोपासत समाजाला व महामानवाला खरी आदरांजली अर्पण करण्यासाठी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले वा तसेच तहानलेल्या वाटसरुना पाण्यासाठी वण वण पिण्याच्या पाण्याची भटकंती नाही करावी लागावी म्हणून "चवदार तळे पाणपोई" ची व्यवस्था संविधान चौक राजुरा येथे केली.यावेळी ज्ञानाच्या अथांग महासागरास ३६ रक्तदात्यांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली."जात"हा अपघात आहे, त्याबद्दल "गर्व" कधीच करू नका कारण "काळ" आणि "वेळ" आल्यावर जातीच नाही तर "माणुसकीचं" रक्त कामाला येतं. (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti)

        अमोल राऊत व त्यांचे नागवंश युथ फोर्स बहुद्देशीय संस्था राजुरा,चे सहकारी रक्तदान शिबिराचे आयोजन करून गरीब, गरजूंना नेहमी रक्ताची मदत मोठ्या सेवा भावाने करतात. आज परमपूज्य, विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली. 

        सर्व रक्तदात्यांनी बुद्धभूमी बसस्थानक समोर राजुरा येथे आयोजित शिबिरात सहभाग घेत रक्तदान केले. नागवंश युथ फोर्स बहुउद्देशिय संस्था  राजुराचे अध्यक्ष अमोल राऊत, सचिव धनराज उमरे, रवी झाडे, जय खोब्रागडे,नूतन ब्राम्हणे, सागर चाहांदे, आकाश नळे, उत्कर्ष गायकवाड, राहुल अंबादे, रविकिरण बावणे, नितीन कांबळे, गणेश देवगडे या सर्वांचे अनमोल असे योगदान लाभले. महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा रक्तकेंद्र जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील सोशल सर्व्हिस अटेंडंट पंकज पवार, प्रयोग शाळा तंत्रज्ञ अमोल जिडेवार, अमुल रामटेके, आशीष कांबळे,रुपेश डहाळे, सहाय्यक अभिलाष कुकडे, वाहन चालक रुपेश घुमे यांचे यावेळी मोलाचे सहकार्य लाभले. आयोजकांनी सर्वांचे आभार मानले. (aamcha vidarbha) (vidarbha) (maharashtra) (rajura)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top