Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अखेर सिमेंट उद्योगातील ठेकेदारी कामगारांना मिळाला न्याय
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विजयक्रांती कामगार संघटनेनी मानले जिल्हाधिकारी यांचे आभार कुशल १०५, अर्धकुशल १०० व अकुशल ९५ प्रती दिवस प्रमाणे पगारवाढ तीन दिवसाचे आंदोलन अख...

विजयक्रांती कामगार संघटनेनी मानले जिल्हाधिकारी यांचे आभार
कुशल १०५, अर्धकुशल १०० व अकुशल ९५ प्रती दिवस प्रमाणे पगारवाढ
तीन दिवसाचे आंदोलन अखेर यशस्वी
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. 13 एप्रिल 2024) -
        चंद्रपूर जिल्ह‌यातील अंबुजा सिमेंट-अल्ट्राटेक सिमेंट-एसीसी सिमेंट कंपन्यामध्ये ठेकेदारी पध्दतीने काम करणाऱ्या कामगारांचे वेतन वाढ निश्चित करण्यात आली. मार्चच्या पहिल्या आठवड्यात पगारवाढ व अप्रैल २०२४ नवीन वाढिव पगारवाढ व १ अप्रैल २०२३ पासून तर ३१/३/२०२४ पर्यंत १२ महीन्याचे एरियर्स ठेका कामगार यांना १६ मार्च पूर्वी देण्यात येत आहे . 

        कामगारांच्या विविध मागण्यासाठी विजयक्रांती ठेकेदारी कामगार संघटनेने जानेवारी महिना अखेर २९ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२४ रोजी तीन दिवस काम बंद आंदोलन पुकारलेले होते अखेर एसीसी-अंबुजा अल्ट्राटेक सिमेंट मॅनेजमेंटनी  माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यासमोर ठेकेदारी कामगारांना पगारवाढ देण्याबाबत कबुली देऊन त्या प्रकारे मिनिट्स ऑफ मीटिंग तयार करण्यात आलेले होते परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये निवडणूक आचारसंहिता लागल्यामुळे सदर बाबीला थोडासा विलंब झाला परंतु २१ मार्च २०२४  रोजी विजयक्रांती कामगार संघटनेच्या पदाधिकारी यांनी माननीय जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सदर विलंबनाबाबत नाराजी व्यक्त केली त्यांनी तत्काळ कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांना आदेश देऊन यासंदर्भात लवकरात लवकर तोडगा काढून निर्णय कळविण्याचे आदेश दिलेले होते त्यानुसार दिनांक ३० मार्च २०२४ रोजी एसीसी- अंबुजा व अल्ट्राटेक सिमेंट व्यवस्थापनाने कुशल कामगारांच्या पगारात रु. १०५ प्रतिदिन वाढ, अर्धकुशल कामगारांच्या पगारात १०० रु. प्रतिदिन पगारवाढ व अकुशल कामगारांच्या पगारात ९५ रु. प्रतिदिन वाढ देण्याबाबत निर्णय घेऊन त्याबाबतचे मिनिट्स ऑफ मीटिंग तयार करून विजयक्रांती कामगार संघटनेच्या पदाधिकारी यांचे मिनिट्स मीटिंगवर स्वाक्षऱ्या घेऊन त्या प्रकारचे कागदपत्र माननीय जिल्हाधिकारी यांना सर्व कंपन्यांनी सादर केले. परंतु प्रस्थापित एका कामगार संघटनेने हेकेखोर भूमिका घेऊन निवडणूक झाल्यानंतर पगार वाढ देण्याबाबत कंपनीकडे विनवणी केली परंतु कंपनीने त्यांच्या विनंतीला मान्यता दिली नाही. विजयक्रांती कामगार संघटने सोबत अधिकृत करारनामे केले आणि कामगारांची पगार वाढ घोषित करण्यात आलेली आहे. 

        या सर्व एकंदरीत प्रकरणांमध्ये विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांचे मार्गदर्शन व आ. सुभाष धोटे (Subhash Dhote), जिल्हा प्रशासनाचे सहकार्य यांचेमुळे कंपन्यांनी विजयक्रांती कामगार संघटनेला प्राधान्यक्रम देऊन पगारवाढ बाबत सकारात्मक निर्णय घेतला. प्रस्थापित कामगार संघटनांनी यापूर्वी कामगारांना ३० ते ४० रुपये व जास्तीत जास्त ५७ रुपये पगार वाढ कंपनी देण्यास तयार असल्याबाबत कळविले होते. २०२० रोजी झालेल्या पगारवाढ पेक्षा ही पगारवाढ अत्यंत कमी असल्याचे ठेकेदारी कामगारांचे निदर्शनात आल्यानंतर त्यांनी गल्लीतल्या नेत्यांची प्रस्थापित कामगार संघटना यांचे विरुद्ध आक्रोश व्यक्त करत जानेवारी महिन्यामध्ये काम बंद आंदोलन केले. त्यामध्ये सर्व ठेकेदारी कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्यामुळे कंपनी प्रशासनाला अखेर कामगारांपुढे झुकते माप घ्यावे लागले या पगारवाढीचे श्रेय विजय क्रांती कामगार संघटनेचे व ठेकेदारी कामगारांचे स्थानिक नेतृत्व करणारे पदाधिकारी विजय ठाकरे (Vijay Thackeray), जिल्हाध्यक्ष विजय क्रांति यूनियन, सुनील ढवस, बबन आत्राम महासचिव, दशरथ राऊत, हरी पुनवटकर, सुधीर विधाते, मानसिंग पांचाल यांच्या संघर्षामुळे आज चांगला दिवस ठेकेदारी कामगारांसाठी उजाडल्याने कामगारांमध्ये हर्ष उल्लास  बघायला मिळत आहे. (aamcha vidarbha) (vidarbha) (gadchandur)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top