Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: क्षेत्राच्या विकासाकरिता झटणाऱ्या सुधीरभाऊंना निवडून आणा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धनगर समाज मेळाव्यात डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले आवाहन जुनसुर्ला येथे धनगर समाज मेळाव्यात उलटला जनसागर आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि...

धनगर समाज मेळाव्यात डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले आवाहन
जुनसुर्ला येथे धनगर समाज मेळाव्यात उलटला जनसागर
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १६ एप्रिल २०२४) -
        मुल तालुक्यातील जुनसुर्ला गावात धनगर समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी , धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्याताई गुरनुले, वंदना अगरकाटे, पांडु मार्गोवार, बोताताई कन्नावार, चंद्रकांत आष्टणकर, डॉ. यशवंतराव कन्नमवार, सुनंदा अल्लीवार, संजय गेनुरकर, गंगाधर धुळेवार, मारोती येग्गेवार, रणजीत समर्थ, उपसरपंच राजेश गोवर्धन, बाळा पाटेवार, अमोल चुदरी, जानू मिटपल्लीवा, पांडुरंग कंकटलावार, प्रशांत बोंबाडे, सुनिता येग्गेवार, लक्ष्मीताई बालूगवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

       धनगर समाज जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी म्हटले कि, भाऊंचा 300 च्या वर दाखला देतांना काँग्रेसने 50 वर्षापासून समाजाकरिता काही केले नाही. मोदी शासनात  370 कलम हटविणे, श्रीराम मंदिर, उज्वला गॅस योजना, अंत्योदय व दारिद्र्यरेषेखाली लोकांना मोफत धान्य देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये, शेतकऱ्यांना बोनस वीस हजार रुपये हेक्टरी बोनस देण्यात येत आहे. संसदेत महिलांना 33% आरक्षण, महिलांना बसमध्ये 50 टक्के तिकिटात सवलत महिलांसाठी अनेक योजना मोदी सरकार राबवत आहे. सुधीरभाऊने कॅन्सर दवाखाना, मेडिकल कॉलेज, सैनिक स्कुल, बॉटनिकल गार्डन, सुंदर रस्ते, अब्दुल कलाम गार्डन अशी अनेक विकास कामे केली आहेत. पुण्यश्लोक अहिल्याबाई पासून समाजाने ऊर्जा घेऊन आपली प्रगती साधायची आहे. आपल्याना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे आदर्श विचार घेऊन पुढे जायचे आहे, धनगरांना अनेक योजनांचा लाभ मिळवायचा असेल तर सुधीरभाऊंनाच संसदेत पाठवण्यासाठी मतदान केले पाहिजे. 
धनगर समाज हा भोळा समाज आहे, विकासाचे काम विशद करावयाचे आहे म्हणून मोदींनी सुधीर भाऊंना उमेदवारी दिली. विकासाची गंगा आणण्यासाठी सुधीरभाऊंना निवडून द्यावे असे आवाहन डॉक्टर मंगेश गुलवाडे यांनी केले. (Dr. Mangesh Gulwade)

        माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, यांनी म्हटले की भाऊने विधानसभेच्या क्षेत्राचा जो कायाकल्प केला तो आपल्या डोळ्यांच्या समोर आहे. दुर्गम समझला जाणाऱ्या या क्षेत्रात विकासकामे झालेली असून ती आपल्या डोळ्यांसमोर आहेत. परिसरात सुंदर रस्ते, सामाजिक सभागृह, सिंचनाचा सोयी याकरिता प्रयत्न करण्यात आले आहे. धनगर समाजाचा मुख्य व्यवसाय हा शेळीमेंढी पोसण्याचा असून मेंढपाळांना शेळी-मेंढी घेऊन जंगलात जावे लागते याकरिता अनेक ठिकाणी चराई क्षेत्र सुद्धा देण्यात आले आहे.  
      
        धनगर समाजाला एकत्रित होऊन आपली शक्ती देखविण्याचे आवाहन आपल्या प्रास्ताविक मध्ये डॉ. यशवंत कन्नमवार यांनी केले. संचालन दुर्योधन कन्नमवार, आभार सरपंच धुळेवार साहेब यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मयूर भोकरे, प्रवीण गिलबिले, पवन ढवळे, प्रज्वल गिलबिले तसेच गावातील युवा तरुणांनी विशेष परिश्रम घेतले. (aamcha vidarbha) (vidarbha) (Chandrapur-vani-aarni loksabha shetra) (chandrapur) (dhangar)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top