Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: लोकसभेच्या निवडणूकीत 'त्या' अभद्र युतीची चर्चा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचा बदला शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते घेतील काय? आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. १६ एप्रिल २०२४) -   ...

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचा बदला शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते घेतील काय?
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १६ एप्रिल २०२४) -
        १८व्या लोकसभेच्या पहिल्या टप्याच्या निवडणूकीचा प्रचार येत्या काही तासात संपणार नाही. यंदाच्या निवडणूकीत कोण येणार? कुणाची सरशी आहे? यावर चौका-चौकात चर्चा सुरू आहे. या निवडणूकीत सर्वसामान्यांच्या हातात, मोबाईल आल्यांने, कुणापासून काहीही लपून राहत नाही. त्यामुळे असलेल्या माहीतीची चर्चा या निवडणूकीच्या माध्यमातून होत आहे. राजूरा विधानसभेत कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या अभद्र युतीची चर्चा आता उघडपणे केली जात असून, त्या निवडणूकीत काँग्रेस ने शेतकरी संघटनेला दिलेली अस्पृष्यतेची वागणूकीचा बदला घेण्यांची संधी शेतकऱ्यांना मिळाल्याची चर्चा आहे.

        कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत वामनराव चटप यांना सत्ता मिळून त्यांची ताकद वाढू नये याकरीता काँग्रेसने त्यांचे कट्टर विरोधक भाजपा सोबत हातमिळवणी केली होती. सत्तेत येण्याकरीता, भाजपावर तुटून पडणारे कट्टर काँग्रेसी नेतेही या निवडणूकीत विजयाकरीता भाजपा सोबतच्या युतीत सहभागी झाले होते. शेतकरी संघटनेला काँग्रेस सोबत जायचे होते, तसा प्रस्तावही चटप समर्थकांकडून गेला असल्याची माहिती आहे.  मात्र चटप सत्तेत आल्यास, विधानसभेत आपल्याला 'जड' जाईल अशी भिती काँग्रेसला वाटल्यांने, त्यांनी शेतकरी संघटनेचा प्रस्ताव धुळकावित, भाजपासोबत घरोबा केला. या अभद्र आणि अनैसर्गीक युतीवरून त्यावेळी प्रचंड नाराजी निर्माण झाली होती.

         कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचा बदला शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते घेतील काय अशी चर्चा जोर धरू लागली आहे. वामनराव चटप यांनीही, काँग्रेस नंबर एक शत्रु तर भाजपा हा दोन नंबरचा शत्रु असे जाहीर सांगत आपला पाठींबा अप्रत्यक्ष कुणाकडे? याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (aamcha vidarbha) (vidarbha) (Chandrapur-vani-aarni loksabha shetra) (chandrapur) (rajura)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top