Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सास्ती येथे दोन विद्यार्थ्यांचा नाल्यातील पाण्यात बुडुन मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आर्थिक मदतीची मागणी - सास्ती येथे तणाव आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा  (दि. 02 मार्च 2024) -          राजुरा तालुक्यातील सास्ती गावी आज 2 म...

आर्थिक मदतीची मागणी - सास्ती येथे तणाव
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा  (दि. 02 मार्च 2024) -
         राजुरा तालुक्यातील सास्ती गावी आज 2 मार्च ला सकाळी शाळा सुटल्यानंतर पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दोन्ही मुलांचे प्रेत पाण्याबाहेर काढले आहे. या मृत मुलांची नावे पियुष राकेश सिडाम, वय17 व साहिल रमेश कुंदलवार, वय 15 अशी आहेत. हे दोघेही मित्र सास्ती लगतच्या नाल्यावर पोहण्यासाठी आले होते.

        मिळालेल्या माहितीनुसार सास्ती या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या इनटेक विहीरीजवळ नाल्याचे बाजुला वेकोलिच्या चड्डा या कंत्राटी कंपनीने माती टाकल्याने तिथे पाणी जमा होऊन तलाव निर्माण झाला. या तलाव सदृश्य जमा झालेल्या पाण्यात हे दोन विद्यार्थी पोहायला गेल्यावर पाण्याचा आणि तेथील मातीच्या गाळाचा अंदाज न आल्याने ते फसले आणि त्यातच त्या दोन्ही मित्रांचा दुर्देवी मृत्यू झाला. यातील एक विद्यार्थी इयत्ता 11 वी व दुसरा इयत्ता 9 वीत होता.

        घटनेची माहिती मिळताच तातडीने गावकरी घटनास्थळी पोहोचले आणि राजुरा पोलिसांना माहिती दिली. यानंतर प्रेत बाहेर काढण्यात आले. मात्र यानंतर कंपनीने नाला रोखून अनाठायी तलाव निर्माण केला, त्यामुळे कंपनीने तातडीने आर्थीक सहायता द्यावी अन्यथा तोपर्यंत मृतदेह न उचलण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली. आता या भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत येथुन जमावाने प्रेत उचलु दिले नाही. (aamcha vidarbha) (rajura)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top