Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जिप माजी सभापती सुनील उरकुडे यांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे वेकोली विरोधात आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तब्बल साडेचार तास सास्ती खदाणीचे काम व कोळसा वाहतूक होती बंद आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा  (दि. २ मार्च २०२४) -          वेकोली द्वारे वि...

तब्बल साडेचार तास सास्ती खदाणीचे काम व कोळसा वाहतूक होती बंद
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा  (दि. २ मार्च २०२४) -
         वेकोली द्वारे विविध परियोजनांकारिता टप्प्या टप्प्याने जमिनी अधिग्रहित केल्या जात आहे परंतु अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण होऊन आर्थिक भुगतान केल्यानंतर अथवा अगदी भुगतान करतांना म्हणजे अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वेकोली द्वारे तुकडाबंदी, एकत्रीकरण, कोरडवाहू/ओलती असे अनेक कारण समोर करून ऐन वेळी शेतकऱ्यांना अडचणीत आणल्या जात असल्याने माजी सभापती सुनील उरकुडे यांनी सदर विषयांवर दोन तीन दा बैठका घेतल्या, पत्र दिले पण वेकोली द्वारे नुसते आश्वासन मिळत गेल्याने प्रकल्प ग्रस्तांनी कंटाळून आज दिनांक 2/3 2024 ला सकाळी नऊ वाजता पासून सास्ती कोळसा खाणीच्या परिसरात आंदोलन करत तब्ब्ल साडेचार तास उटखानांनाच काम व कोळसा वाहतूक् बंद पाडली. 

        नंतर वेकोली प्रशासनाचे क्षेत्रीय प्रबंधक द्वारा चार दिवसात एकत्रीकरण व ओलीत व सस्ती एकसपनशन च्या नोकरीची फाईल हे तीन विषय मार्गी लावणार असे आश्वासन व उर्वरित समस्यां लवकरच मार्गी लावण्याच्या प्रयत्न करणार असे आश्वस्त करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व माजी सभापती सुनील उरकुडे सोबत सरपंच हरिदास झाडे, हरिश्चन्द्र जुनघरी,शंकर बोढे, अविनाश उरकुडे,दिलीप वैद्य, मधुकर सोयाम, रामदास देवाळकर प्रज्योत चिडे,मंगेश दरेकर,हर्षल वनकर, अजय बंदूरकर,वैभव काळे, रोशन बोबडे, शंकर पा लांडे, असे समस्त माथरा व गोवरी येथील प्रकल्प ग्रस्त सहभागी होते (aamcha vidarbha) (rajura) (wcl ballarpu area) (sasti)


Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top