“999 महिला भक्तांचा गौरव – भक्तिरसाचा अविस्मरणीय सोहळा”
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
गडचांदूर (दि. २७ सप्टेंबर २०२५) -
श्रीतेज प्रतिष्ठान व माता महाकाली महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गडचांदूर येथे दिनांक 24 व 25 सप्टेंबर रोजी भव्य माता महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाविकांनी उत्साहात सहभाग नोंदविला.
24 सप्टेंबर रोजी सकाळी चंद्रपूर माता महाकाली महोत्सव समितीच्या रथात चांदीच्या प्रतिमेसह माता महाकालीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव रोड येथून सुरुवात झालेली ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गाने विठ्ठल मंदिर येथे विसर्जित झाली. मार्गावर रांगोळ्यांनी सजावट करण्यात आली व ठिकठिकाणी स्वागताचे आयोजन करण्यात आले. विशेषतः महिलांचा या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. जीवतीच्या भजन मंडळ्यांनी आपल्या गायनाने भाविकांना मंत्रमुग्ध केले.
या प्रसंगी 999 महिला भक्तांना पवित्र ओट्या अर्पण करून गौरविण्यात आले. झी टीव्हीवरील सारेगामापाच्या कलाकारांनी भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाने भाविकांना मंत्रमुग्ध केले. दुपारी अचानक झालेल्या पावसामुळे थोडी गैरसोय झाली असली तरी महिलांच्या उत्साहात कुठेही कमी जाणवली नाही.
कार्यक्रमात केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, चंद्रपूर खासदार प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर आमदार किशोर जोरगेवार, माजी आमदार अँड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, भाजप नेते प्रकाश देवतले, राष्ट्रवादी नेते आबिद अली, युवा मोर्चा राज्य नेते आशीष देवतळे, भाजपचे युवा नेते निलेश ताजने, अजय जयसवाल, चंद्रकांत वासाडे, बलराम डोगरानी, तुषार सोम, नामदेव दाहुले, सविता दांधारे, मिलिंद गंपावार, राजू शास्त्रकार, सायली येर्न, सुरेश केंद्र आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित भाविकांना संबोधित करताना, गडचांदूरवासीयांवर महाकाली मातृशक्तीचे आशीर्वाद सदैव राहतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच निलेश ताजने यांच्या समाजसेवेचे कौतुक करून त्यांच्या कार्याला समाजासाठी सकारात्मक दिशा देणारे असल्याचे गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाचे संचालन हरिहर खरवडे गुरुजी यांनी केले तर आभार प्रदर्शन तुलसीराम पनघाटे यांनी केले. 25 सप्टेंबर रोजी स्थानिक विठ्ठल रखुमाई मंदिरात होमहवन व देवी पूजन झाले. त्यानंतर महाप्रसाद वाटप करून महाकालीच्या रथाला विधीवत निरोप देण्यात आला. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी श्रीतेज प्रतिष्ठान व माता महाकाली आयोजन समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
#GadchandurMahakaliFestival #MahakaliMela2025 #DevotionAndTradition #CulturalHeritage #WomenInDevotion #BhaktiSangeet #GadchandurNews #ShritejPratishthan #matamahakali #MataMahakaliMahotsav #HansrajAhir #MLA #kishorjoragewar #ChairmanoftheCentralOBCCommission #advsanjaydhote #sudarshannimkar #prakashtevtale #aashishdevtale #aabidali #MP #PratibhaDhanorkar #milindgampawar #NileshTajne #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.