Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: विविध मागण्यासह महा मिनरल्स कंपनीवर राजुरा शिवसेनेचा एल्गार मोर्चा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
करा आता तयारी येत आहे तुफान भारी.. लवकरच निघेल रोजगाराची स्वारी आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा  (दि. २ मार्च २०२४) -          स्थानिक बेरोज...

करा आता तयारी येत आहे तुफान भारी.. लवकरच निघेल रोजगाराची स्वारी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा  (दि. २ मार्च २०२४) -
         स्थानिक बेरोजगारांना रोजगारात समाविष्ट करणे, गोवरी ग्रामपंचायतचा थकीत कर भरणा करने, परिसरातील शेतातील होणाऱ्या नुकसानीचा मोबदला देणे अश्या विविध मागण्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राजुरा आणि एच एम युनियन बल्लारपूर विभाग यांच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला.

         शिवसेना जिल्हा प्रमुख संदि गिऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात हजारो नागरिकांच्या संख्येत हा भव्य मोर्चा काढण्यात आला. सर्व मागण्यासाठी कंपनीने प्रशासनाने सकारात्मकता दर्शवत या महिन्यात ग्रामपंचायत गोवरीचा कर भरून स्थानिकांना रोजगारात समाविष्ट करण्याचे आश्वासन देण्यात आले.

        या प्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख संदीप वैरागडे, माजी संघटक नरसिंग मादर, युवासेना उपजिल्हा प्रमुख कुणाल कुडे, युवासेना तालुका प्रमुख कोरपना अंकुश वांढरे, युवासेना तालुका प्रमुख राजुरा बंटी मालेकर, शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, तालुका समन्वयक प्रदीप येनूरकर, गोवरीच्या सरपंच आशाताई उरकुडे, रामपूरच्या सरपंच निकिताताई झाडे, मानोली बाबापूरच्या उपसरपंच सत्यशीला वरारकर, विभाग प्रमुख अमोल कोसूरकर, विभाग प्रमुख बबलू कुशवाह, ग्रा प सदस्य नीलिमाताई कोसूरकर, नीलिमा ताई देवाळकर राजुरा तालुका शिवसेना पदाधिकारी, एच एम एस युनियन पदाधिकारी आणि तालुक्यातील महिला, युवक, शेतकरी हजारोच्या संख्येने उपस्थित होते. मोर्चा यशस्वी करण्यासाठी उपविभाग प्रमुख ग्रा प सदस्य मनोज कुरवटकर, पं.स विभाग प्रमुख सुरज नक्कावार, उपविभाग प्रमुख प्रफुल मादास्वार, पं.स विभाग प्रमुख संदिप घ्यार.गणेश चौधरी.राजू लोणारे यांनी मेहनत घेतली. (aamcha vidarbha) (rajura) (baban urkude)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top