Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: लालगुडा शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त चिमुकल्यांचे छोटे प्रयोग
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी  गडचांदूर (दि. २ मार्च २०२४) -          कोरपना तालुका अंतर्गत गडचांदूर केंद्रातील लालगुडा ज...

आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी 
गडचांदूर (दि. २ मार्च २०२४) -
         कोरपना तालुका अंतर्गत गडचांदूर केंद्रातील लालगुडा जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपली जिज्ञासा जागृत ठेवून प्रत्येक गोष्टीत वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत ठेवावा, असे शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश बोबडे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून सांगितले. तसेच शाळेचे प्रयोगशील शिक्षक गोविंद पेदेवाड यांनी थोर शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही रमण यांच्या विषयी माहिती देऊन "विज्ञानाची कास धरा आणि देशाची प्रगती करा "असा विद्यार्थ्यांना संदेश दिला. त्यांनी हवेचा दाब ,हवेला वजन असते, ज्वलनास ऑक्सिजनची आवश्यकता असते, पाणी शुद्धीकरण अशा छोट्या छोट्या प्रयोगातून विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट केल्या.

        यावेळी शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी  देखील विविध वैज्ञानिक प्रयोग  सादर केले. पाण्याचा पृष्ठीय ताण, पाण्याची घनता तपासणे, जलचक्र, सूर्यमाला, फुफुसाचे आकुंचन -प्रसरण इत्यादी. यावेळी विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषा घेण्यात आली व सर्व बाल वैज्ञानिकांनी सादर केलेल्या प्रयोगाचे खूप खूप कौतुक करण्यात आले. (aamcha vidarbha) (rajura)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top