आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०४ मार्च २०२४) -
शेतीत नवनवे प्रयोग करणारे जिल्ह्यातील सहा शेतकरी यंदा राज्य शासनाच्या कृषी भूषण पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. राजुरा येथील महिला शेतकरी विमलादेवी गेडा यांच्या रूपाने जिल्ह्याला प्रथमच जिजामाता कृषी भूषण पुरस्काराच्या सन्मान वाट्याला आला आहे. शेतीसमोर आज अनेक संकटे उभी ठाकली आहेत, मात्र पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी त्यावर मात कशी केली व शेतीत कोणते बदल केले यासारखे अनेक प्रश्न पुढे आले. त्यानिमित्ताने सिंदेवाहीचे माधव आदे, वायगाव चे सुरेश गरमडे, वेजगावचे परशुराम लेडांगे, लावारीचे नामदेव दडमल आणि राजुरा येथील सौ. विमलादेवी वाघुजी गेडाम यांनी आपले अनुभव मांडले.
2020 च्या सर्वसाधारण गटातील वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार सिंदेवाही येथील माधवा आदे व वरोरा तालुक्यातील वायगाव येथील सुरेश गरमडे यांना जाहीर झाला. सर्वसाधारण गटातून 2021 शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार तालुक्यातील वेजगाव येथील परशुराम लेडांगे यांना जाहीर झाला आहे. आदिवासी गटातून 2021 च्या कृषी प्रदर्शन पुरस्कार चिमूर तालुक्यातील लावारी येथील नामदेव दडमल यांना, तर 2022 च्या पुरस्कार गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव येथील देवराव शेडमाके यांना देण्यात येणार आहे. तसेच 2022 चा जिजामाता कृषी भूषण पुरस्कार राजुरा येथील महिला शेतकरी सौ. विमलादेवी गेडाम यांना प्रदान करण्यात येणार आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रातील माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या हस्ते सौ. विमलादेवी गेडाम याना शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच यासह पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य खुशाल बोंडे यांच्या तर्फे सुद्धा सत्कार करण्यात आला यावेळी राजुरा तालुका महामंत्री प्रशांत घरोटे, जिल्हा उपाध्यक्ष कामगार आघाडी महादेव तपासे, अल्पसंख्याक आघाडी शाहनवाज अली, ओबिसी आघाडी जिल्हा महामंत्री संदीप पारखी, प्रदेश आदिवासी आघाडीचे वाघूजी गेडाम, रामचंद्र घटे आदीसह गेडाम कुटुंबीय उपस्थित होते. (aamcha vidarbha) (rajura)
Advertisement

Related Posts
- ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचा दौरा ठरला सामाजिक बंधाची साक्ष07 Aug 20250
ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचा दौरा ठरला सामाजिक बंधाची साक्षचंदनखेडे गुरुजींना सदिच्छा भेट...Read more »
- वीज पडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू, बैलही ठार07 Aug 20250
वीज पडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू, बैलही ठारराजुरा तालुक्यात दु:खद घटनाआमचा विदर्भ - दीपक शर्मा ...Read more »
- धान्य वितरणातील गोंधळामुळे लाभार्थ्यांचे हाल07 Aug 20250
धान्य वितरणातील गोंधळामुळे लाभार्थ्यांचे हालतीन महिन्यांच्या रेशनपासून नागरिक वंचितआमचा विदर्भ - अवि...Read more »
- रस्त्यांवरील मुरुम, गिट्टीचा धोकादायक खेळ थांबवा07 Aug 20250
रस्त्यांवरील मुरुम, गिट्टीचा धोकादायक खेळ थांबवाशहरातील रस्ते साफसफाईबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्राआम...Read more »
- नागभीड तालुक्यात महसूल सप्ताहात राबविले जाणार अभिनव उपक्रम03 Aug 20250
नागभीड तालुक्यात महसूल सप्ताहात राबविले जाणार अभिनव उपक्रमआमदार बंटी भांगडीया यांच्या हस्ते महसूल सप...Read more »
- प्रॉपर्टी व्यवहार आता अधिक सुकर – नागरिकांसाठी मदतीचे नवे दालन03 Aug 20250
प्रॉपर्टी व्यवहार आता अधिक सुकर – नागरिकांसाठी मदतीचे नवे दालन राजुरा तालुका जय शिवराय प्रॉपर्ट...Read more »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.
EmoticonClick to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.