Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कुजण्याच्या स्थितीतील वृद्धाचा मृतदेह राहत्या घरात आढळला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मृतक राजुरा नगर पालिकेचा सेवानिवृत्त कर्मचारी  आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा (दि. ४ मार्च २०२४) -         नगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचा...

मृतक राजुरा नगर पालिकेचा सेवानिवृत्त कर्मचारी 
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. ४ मार्च २०२४) -
        नगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी पुंडलिक कोल्हे वय 65 वर्ष यांचा कुजण्याच्या स्थितीतील मृतदेह रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी रात्री 12:30 वाजताच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी आढळुन आल्याने खळबळ उडाली आहे.

        प्राप्त माहितीनुसार राजुरा नगर पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी पुंडलिक कोल्हे आंबेडकर वॉर्डातील आपल्या राहत्या घरी एकटेच होते. त्यांचे इतर कुटुंबीय नागपुर येथे वास्तव्यास आहेत. रविवारी रात्रीच्या सुमारास शेजारील लोकांना त्यांच्या घरातुन दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र सुगावा न लागल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. राजुरा पोलिसांनी घराचा दरवाजा उघडुन बघीतले असता पुंडलिक कोल्हे पलंगावर मृतावस्थेत आढळले.

        प्रेताच्या स्थितीवरून व पसरत असलेल्या दुर्गांधीवरून त्यांचा दोन ते तीन दिवसांपूर्वीच मृत्यु झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मृतक शुक्रवार पासुन आढळुन आले नसल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. घटना उघडकीस आल्यानंतर त्यांच्या 'नागपुर येथील कुटुंबीयांना कळविण्यात आले आहे. राजुरा पोलिसांनी मर्ग दाखल केला असुन पुढील तपास सुरू आहे.
 (aamcha vidarbha) (rajura)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top