Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बामणी येथे कब्रस्तानाला गट्टू लावण्याकरिता दहा लाखाचा निधी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजन मधून मंजूर कामाचे भूमिपूजन आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. १० मार्च...

शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजन मधून मंजूर कामाचे भूमिपूजन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १० मार्च २०२४) - 
        बामणी ग्रामपंचायत क्षेत्रातील मुस्लिम कब्रस्तानाला गट्टू लावण्याचे काम शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते (nitin matte) यांनी जिल्हा नियोजन समिती चंद्रपूर या मार्फत मंजूर करून घेतले. अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख चंद्रपूर तथा बल्लारपूर तालुकाप्रमुख जमील शेख यांनी याकरिता मागणी केली होती. सदर मागणी पूर्ण झाल्याबद्दल बामणी गावातील अनेक मुस्लिम बांधवांनी आनंद व्यक्त करून नितीन मत्ते व जमील शेख यांचे आभार मानले. याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेशाने, शिवसेना पूर्व विदर्भ समन्वयक किरण पांडव व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सहकार्य लाभले. 

        चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख पदी नितीन मत्ते यांची ज्यावेळी जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती झाली तेव्हापासून तीनही विधानसभा क्षेत्रातील विकास कामाबाबत जागृत असून नितीन मत्ते यांच्या माध्यमातून बल्लारपूर नगरपरिषद मध्ये सुद्धा निधी वितरत करण्यात आलेला आहे. चंद्रपूर विधानसभेत, वरोरा विधानसभेत सुद्धा निधी वितरित करण्यात आलेला आहे, किरण पांडव यांच्या विशेष सहकार्याने नितीन मत्ते हे विकासकामाकडे जातीने लक्ष देऊन ते मंजूर करून घेत आहे, बामणी ग्रामपंचायत मधील मुस्लिम कब्रस्तान येथील गट्टू लावण्याच्या कामाचे भूमिपूजन नितीन मत्ते यांच्या हस्ते पार पडले यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख कमलेश शुक्ला, बामणीचे सरपंच बुधाजी आलाम, वरोरा शहर प्रमुख राजेश डांगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रपूर अल्पसंख्याक सेल शेख अनवाज, अल्पसंख्यांक सेल बल्लारपूर मोहम्मद शफी, शहरप्रमुख एजाज शेख, जाकीर शेख, शरीफखांन पठाण, नकीब अन्सारी, शेख सिराज, शाबीर शेख, अफसर शेख, इम्रानखान, शेख व शिवसैनिक तथा गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. (aamcha vidarbha) (bamani) (chandrapur)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top