Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केले आवाहन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांची उपस्थिती आमचा विदर्भ - अविनाश रामटेके, प्रतिनिधी विरूर चंद्रपूर (दि. १० मार्च २०२४) -         राजुरा त...

अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांची उपस्थिती
आमचा विदर्भ - अविनाश रामटेके, प्रतिनिधी विरूर
चंद्रपूर (दि. १० मार्च २०२४) - 
       राजुरा तालुक्यातील पोलीस उपविभाग अंतर्गत येत असलेल्या भागातील पोलीस पाटील व शांतता समिती सदस्य यांची बैठक उपविभागीय पोलीस कार्यालय राजुरा येथे आयोजित करण्यात आली होती. सदर शांतता बैठक अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर रीना जनबंधू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपविभागीय अंतर्गत येत असलेल्या सर्व पोलीस ठाण्याचे ठाणेदार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे निमंत्रित शांतता समितीचे सदस्य व पोलीस पाटील मोठ्या संख्येने सहभाग घेत आपल्या परिसरातील परिस्थिती ची मांडणी केली.
           
        यावेळी उपस्थित सदस्यांना संबोधित करतांना अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांनी सामाजिक सलोखा व शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपली प्रशासकीय यंत्रणेला सहकार्याची अपेक्षा आहे. तेव्हा येत्या काळात लोकसभा निवडणुकीच्या काळात आचार संहिता दरम्यान विविध धार्मिक सण व महापुरूषांच्या जयंती साजरी केली जाते. मात्र या दरम्यान कुठलेही गालबोट न लागता आगामी सण उत्साह व जयंती उत्सव रीतसर कायद्याच्या नियमात साजरा करण्या करिता आप आपल्या भागात जनजागरण करावे व त्यात आचार संहिता दरम्यान राजकारण चा रंग न चढवता पोलिसांना मदत करावे अशी अपील अप्पर पोलीस अधीक्षक रिना जणबंधू यांनी उपस्थित सदस्यांना केली. 

        प्रामुख्याने आपल्या भागात आज गुन्हेगारीत वाढ होताना दिसून येत आहे. तेव्हा आपल्या भागात होत असलेल्या अवैद्य दारू विक्री, अवैद्य जुगार व  रेती तस्करी संदर्भात कुठलीही माहिती असल्यास आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशन ला याची माहिती द्या, जेणेकरून आपल्या मदतीने भविष्यात होणारे गुन्हे टाळता येईल असे निर्देश उपस्थित सदस्यांना देण्यात आले. (aamcha vidarbha)(chandrapur) (rajura)      

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top