Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: क्रीडा संकुलात अध्ययावत सुविधा उपलब्ध करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आ. सुभाष धोटेंचे आढावा सभेत अधिकाऱ्यांना निर्देश आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. ११ मार्च २०२४) -         राजुरा विधानसभा क्षेत्रातील र...

आ. सुभाष धोटेंचे आढावा सभेत अधिकाऱ्यांना निर्देश
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ११ मार्च २०२४) -
        राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना, गोंडपिपरी या तीनही तालुक्यातील तालुका क्रीडा संकुल समितींची आढावा सभा विश्रामगृह राजुरा येथे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आ. धोटे यांनी तीनही तालुक्यातील तालुका क्रीडा संकुल समिती अंतर्गत सुरू असलेले बांधकामे, क्रीडांगण परिसरातील निर्माण कार्ये, याबाबत येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला. या तीनही ठिकाणी आवश्यक सर्व अध्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध करून खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण देण्यात यावे असे निर्देश दिले. (subhash dhote)

        या प्रसंगी राजुराचे तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गौड, गोंडपिपरीचे तहसीलदार शुभम बहाकार, कोरपनाचे तहसीलदार एस. पी. व्हटकर, मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव, पोलीस निरीक्षक योगेश पारधी, तालुका क्रीडा अधिकारी विजय डोबाळे, जयश्री देवकर, संदीप उईके, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीकांत बोबडे, समाधान भसारकर, शिक्षण विस्तार अधिकारी विजय परचाके, सहाय्यक अभियंता व्ही. व्ही. डाळ, एस. आर. जिवणे, ए. बी. सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते. (aamcha vidarbha) (rajura)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top