Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चंद्रपूर - काँग्रेसमध्ये वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर यांच्या व्यतिरिक्त मुमताज जावेद यांनी सुद्धा मागितली उमेदवारी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तिकीट न मिळाल्यास अपक्ष लढण्याची दर्शविली तयारी जाणून घ्या कोण आहे काँग्रेसच्या मुमताज अब्दुल जावेद आमचा विदर्भ -  दीपक शर्मा राजुरा (दि. १८...

तिकीट न मिळाल्यास अपक्ष लढण्याची दर्शविली तयारी
जाणून घ्या कोण आहे काँग्रेसच्या मुमताज अब्दुल जावेद
आमचा विदर्भ -  दीपक शर्मा
राजुरा (दि. १८ मार्च २०२४) -
        जस जशी लोकसभा निवडणुकीची वेळ जवळ येत आहे तस तसे राजकारणी आप आपले पत्ते उघड करीत आहे. (BJP) भाजपने सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) याना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली असून मुनगंटीवार हे निवडणुकीच्या कार्याला जोमाने लागले आहे. शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते व विख्यात विदर्भवादी नेते अँड. वामनराव चटप (Adv. Vamanrao Chatap) यांनी सुद्धा निवडणूक लढवावी याकरिता शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मनधरणी करीत असल्याची चर्चा सुरु आहे. (Congress) काँग्रेसचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) व वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात लोकसभा उमेदवारीवरून वाद सुरू झाला असून यामुळे पक्षात स्थानिक पातळीवर उभी फूट पडली आहे. आमदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) व प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार (Shivani Vadettiwar) यांच्यात स्पर्धा सुरू आहे. पती बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर नैसर्गिक न्यायाप्रमाणे आपल्यालाच उमेदवारी मिळावी, असा दावा प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहे. ओबीसीबहुल चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी अनेक दावेदार असले तरी मागील चार पिढयांपासून काँग्रेस ला भक्कम करण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या राजुरा तालुक्यातील देवाडा येथील रहिवाशी गणी कुटुंबीयातील माजी पंस सभापती मुमताज जावेद अब्दुल (Mumtaz Javed Abdul) यांनी सुद्धा काँग्रेसला उमेदवारीची मागणी केली आहे. काँग्रेस कडून उमेदवारी न मिळाल्यास कोणत्याही पक्षातून अथवा अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुद्धा असल्याची माहिती त्यांनी ''आमचा विदर्भ" शी बोलतांना दिली. (Chandrapur Arni Lok Sabha Constituency)

        २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विजयानंतर धानोरकरांनी बऱ्याचश्या विधानसभा क्षेत्रातून पाठ फिरवली होती, त्याबद्दल सामान्य नागरिकांव्यतिरिक्त काँग्रेस कार्यकत्यांमध्येही नाराजीचे सूर होते. मात्र बाळू धानोरकरांच्या आकस्मित निधनाने सहानुभूती मिळेल या अपेक्षेने प्रतिभा धानोरकर काँग्रेसच्या तिकीटाची मागणी करत असल्या तरी नेमकी काँग्रेसची तिकीट कोणाला मिळेल हे काँग्रेसची यादी प्रकाशित झाल्यानंतरच समजणार आहे. 

        विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार ह्या असंगठित कामगार क्षेत्रात जम बसवत असून सिमेंट उद्योग, कोळसा खाणी येथील कामगारांच्या पाठिंबा असून त्यासुद्धा प्रमुख दावेदार आहे. त्यातच आता राजुरातील माजी पंस सभापती मुमताज जावेद अब्दुल यांनी उमेदवारी ठोकल्याने काँग्रेसच्या तिकीट करिता तीन महिलांचा रस्सीखेच सुरू झाला आहे.

कोण आहेत मुमताज जावेद अब्दुल
        माजी पंस सभापती मुमताज जावेद अब्दुल ह्या देवाडा येथील माजी उपसरपंच व विद्यमान ग्रापं सदस्य अब्दुल जावेद यांच्या पत्नी आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात विरूर - देवाडा सर्कल मध्ये अब्दुल जावेद यांचे आजोबा तत्कालीन पोलीस पाटील अब्दुल गणी पटेल यांचा मोठा प्रभाव राहिला असून आज तिसऱ्या पिढीतही तो तसाच कायम आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आ. सुभाष धोटे याना सर्वाधिक लीड विरूर - देवाडा सर्कल मधूनच मिळाली होती त्यात गणी कुटुंबीयांचा मोठा वाटा होता. त्याच अनुषंगाने नंतर मुमताज जावेद अब्दुल यांना पंस सभापती पद देण्यात आले होते. अब्दुल जावेद यांचे मोठे वडील अब्दुल हमीद अब्दुल गणी हे जिप सदस्य व पंस सभापती राहिले आहे, ते एकदा देवाडा क्षेत्र सोडून जिवती तालुक्यातील पाटण क्षेत्रातूनही जिंकून आले आहेत हे येथे विशेष. अब्दुल जावेद यांचे वडील हे देवाडा गावात १० वर्षे उपसरपंच पदावर होते. मोठ्या वडिलांचे सुपुत्र अब्दुल हमीद हे सुद्धा उपसरपंच, पंस सदस्य राहिले आहेत व आता विद्यमान आदिवासी सहकारी संस्थेचे संचालक आहेत. अब्दुल आरिफ अब्दुल गणी पटेल हे पोलीस पाटील आहे. माजी पंस सभापती मुमताज जावेद अब्दुल यांचे पती अब्दुल जावेद हे सुद्धा १० वर्षे उपसरपंचपदावर होते व सध्या ग्रापं सदस्य आहे. स्वतः मुमताज जावेद अब्दुल ह्या तीन वर्षे पंस उपसभापती तर दोन वर्षे पंस सभापती राहिल्या आहेत. राजुरा विधानसभा क्षेत्राव्यतिरिक्त बल्लारपूर, चंद्रपूर, घुघुस, भद्रावती, आर्णी क्षेत्रातही त्यांचा मोठा जनाधार आहे. एकीकडे पक्षाकडे ओबीसींच्या नावाने तिकीटाची मागणी सुरु आहे मग इतर लोकांनी तशी मागणी केल्यास त्यात काही गैर काय? असा प्रतिप्रश्न मुमताज जावेद अब्दुल यांनी केला आहे. 

        मुमताज जावेद अब्दुल यांच्या गुगलीने काँग्रेस पक्षांतर्गत काय होते, काँग्रेसची तिकीट न मिळल्यास त्या कोणत्या पक्षाकडून अथवा अपक्ष निवडणुकीत उभ्या राहतात, त्या उभ्या राहिल्यास काँग्रेसला फायदा होईल कि नुकसान हे मात्र निवडणुक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. (aamcha vidarbha) (rajura) (mumtaj abdul jawed)



Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top