Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: महाथापाड्या निवडणूक प्रमुखाचा जनताच भोंगा आवरेल - रंजन लांडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अध्यक्ष तालुका काँग्रेस चा भाजपला टोला त्या एका व्यक्तव्यापायी काँगेस - भाजपा आमने सामने राजकीय टोलेबाजीची सुरुवात आमचा विदर्भ - राजेश अरोरा...

अध्यक्ष तालुका काँग्रेस चा भाजपला टोला
त्या एका व्यक्तव्यापायी काँगेस - भाजपा आमने सामने
राजकीय टोलेबाजीची सुरुवात
आमचा विदर्भ - राजेश अरोरा, प्रतिनिधि
राजुरा (दि. 16 मार्च 2024) -
        तथाकथित विकासपुरुष म्हणून स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या महाथापाड्या निवडणूक प्रमुख उठसूट थापा मारून जनतेची दिशाभूल करीत असल्याचे दिसून येत आहे. म्हणे विकासकामांचा झंझावात सुरू आहे आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण, रोखठोक भुमिकेमुळे महाराष्ट्रभर त्यांना मानणारा वर्ग आहे. अशा नेत्याला उमेदवारी मिळाल्याने विजय सोपा झाला आहे. त्यांनी म्हणे चंद्रपूर जिल्ह्याचा चौफेर विकास करण्यासाठी गेल्या दहा वर्षात "न भुतो न भविष्यती" असा विकासनिधी खेचून आणला. आता पहिले हे समजून घ्या की एक एक चखचकित थाप आहे. कारण बघा बॉटनिकल गार्डन, सैनिकी शाळा, बांबू संशोधन केंद्र, वन अकादमी, वैद्यकीय महाविद्यालय, कॅन्सर हॉस्पिटल, डिजिटल अंगणवाडी शाळा, सुसज्ज वाचनालये, महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी अगरबत्ती केंद्रे, युवकांसाठी रोजगार मेळावे, अद्ययावत क्रीडा संकुल यापैकी एकही काम बल्लारपूर, चंद्रपूर क्षेत्राच्या बाहेर इतर क्षेत्रात शोधूनही सापडणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केवळ वेळ मारून नेली आहे. अजून पर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. आरोग्य व्यवस्थेचे म्हणाल तर जिल्हात अतिशय विदारक चित्र आहे. याला जबाबदार हे तथाकथित विकासपुरुषच आहेत. मुलभूत समस्या सोडविण्यासाठी निधी खर्च न करता कोट्यावधी रुपये केवळ मनोरंजन, नाचगाणे करण्यावर खर्च करून आपल्या चेल्या चपाट्यांचे खिसे भरण्याचेच काम झाले असावे अशी सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा आहे. तसेच यावरून या तथाकथित विकासपुरुषावर प्रचंड रोष आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत नागरिक तो राग व्यक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अनुसूचीत जमातीच्या हक्काचा ठक्कर बाप्पा योजनेचा निधी, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा निधी, नक्षलग्रस्त भागाचा विकास योजना निधी जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये खर्च न करता संपूर्ण निधी बल्लारपूर मतदार संघात वळविला हाच काय सबका साथ, सबका विकास, दिवस रात्र आपल्या नेत्याची नकल करणाऱ्या प्रसिद्धीसाठी हपापलेल्या कर्तृत्वशुन्य व्यक्तीला हे वास्तव कधीच दिसणार नाही आणि पचणारही नाही. त्यामुळे ते स्वतःला कितीही शहाने भासवत असले तरी जनतेने यांचे खरे चेहरे ओळखलेले असून येणाऱ्या निवडणुकीत जनता यांना धडा शिकविल्याशिवाय शांत बसणार नाही एवढे मात्र निश्चित. (aamcha vidarbha) (rajura) (Ranjan Lande)



Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top