Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: यहोवा यिरे फाऊंडेशन तर्फे जागतिक महिला दिन साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या हस्ते २२ महिलांना आदर्श नारी भूषण पुरस्कार आमचा विदर्भ - अनंता गोखरे चंद्रपूर (दि. १८ मार्च २०२४) -    ...

पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या हस्ते २२ महिलांना आदर्श नारी भूषण पुरस्कार
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. १८ मार्च २०२४) -
        यहोवा यिरे फाऊंडेशन तर्फै लाचलुचपत विभागाच्या पोलीस उप अधीक्षक सौ. मंजुषा भोसले, गायन सल्लागार डाॅ. सिरीन मवाणी, जागृती महीला मंच सचिव सौ. कल्पना शास्त्रकार यांच्या हस्ते सामाजिक कार्य करणाऱ्या २२ महिलांना आदर्श नारी भूषण पुरस्कार २०२४ देऊन सन्मान करण्यात आला. 

        यहोवा यिरे फाऊंडेशन व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व अपराध नियंत्रण परिषद द्वारा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुरस्कारप्राप्त महिलांचे अभिनंदन करत लाचलुचपत विभागाच्या पोलीस उप अधीक्षक सौ. मंजुषा भोसले यांनी उपस्थितांशी संवाद साधला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सौ. डाॅ. सिरीन मवाणी, सौ.कल्पना शास्त्रकार, यहोवा यिरे फाऊंडेशनच्या अध्यक्ष कु. एलिजा बोरकुटे, अंतराष्ट्रीय मानवाधिकार व अपराध नियंत्रण परिषद दिल्ली चे महाराष्ट्र सचिव डाॅ. रमेशकुमार बोरकुटे, सर्व सामाजिक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. (aamcha vidarbha) (chandrapur)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top