Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा क्षेत्रातील आदिवासींच्या तिर्थक्षेत्रांचा होणार विकास : आमदार सुभाष धोटेंच्या मागणीला यश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा (दि. २८ फेब्रुवारी २०२४) -         राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी चंद्रप...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. २८ फेब्रुवारी २०२४) -
        राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदार संघातील कोरपना व जिवती तालुक्यातील आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या एकुण ९ तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी धोरण निश्चित करून या सर्व तिर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी, आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी आदिवासी विकास विभाग तसेच महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. विशेष बाब म्हणजे क्षेत्रात जिवती, कोरपना तालुक्यात बहुसंख्य नागरिक हे आदिवासी, कोलाम समाजातील आहेत. या भागात आदिवासींचे एकूण ९ तिर्थक्षेत्र प्रसिद्ध आहेत. नागरिकांचे ते आराध्य दैवत असून लोक मनोभावे पूजा, अर्चना करतात मात्र याकडे आदिवासी विकास विभागाचे अक्षय्य दुर्लक्ष होत असल्याने निधी अभावी आदिवासींचे कुलदैवत असलेल्या तीर्थक्षेत्रांचा विकास खुंटलेला आहे.
            आदिवासी बांधवांच्या तीर्थक्षेत्राचा विकास करणे, तेथील नागरीकांना सर्व सोई-सुविधा पुरविणे आवश्यक असल्याने आदिवासी विकास विभागाकडून सन २०२४-२५ पासून आदिवासी समाजाचे तीर्थक्षेत्र विकासाचे धोरण निश्चित करण्यात यावे. धोरण निश्चितीनंतर आदिवासी समाजाचे तीर्थक्षेत्र विकासाकरिता चंदपूर जिल्ह्यातील कोरपना व जिवती तालुक्यातील आदिवासीचे कुलदैवत श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्राचे ठिकाणी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देतांना राज्याचे आदिवासी विकास विभाग प्रभारी मंत्री तथा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, आ. सुभाष धोटे यांची मागणी स्वागतार्ह असून आदिवासी विकास विभागाशी चर्चा करून यावर लवकरच धोरण निश्चित करुन शासन निर्णय घेण्यात येईल व आदिवासी बहुल भागातील तिर्थक्षेत्रांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले. आ. सुभाष धोटेंच्या मागणीला यश आले असून जिवती कोरपना तालुक्यासह महाराष्ट्रातील आदिवासी बहुल भागातील तिर्थक्षेत्रांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. (aamcha vidarbha) (rajura)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top