Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विहीरगावच्या सरपंचपदी निळकंठ खेडेकर अविरोध
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा (दि. २८ फेब्रुवारी २०२४) -         राजुरा तालुक्यातील मौजा विहिरगाव ग्रामपंचायत येथे सरपंच पदासाठी निवडणूक ...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. २८ फेब्रुवारी २०२४) -
        राजुरा तालुक्यातील मौजा विहिरगाव ग्रामपंचायत येथे सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये ९ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सर्वानुमते विहीरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निळकंठ गोविंदा खेडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अँड. रामभाऊ देवईकर, गणेश वांढरे, रवींद्र टेकाम, लिलाबाई भिवनकर, प्रेमलता बोढे, छाया मडावी, पूजा वाघमारे, माधुरी चिडे यांनी सहभाग घेतला. 

        नवनियुक्त सरपंच निळकंठ खेडेकर यांच्या अविरोध निवडीबद्दल विहीरगाव ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, स्थानिक कार्यकर्ते यु. काँ. तालुकाध्यक्ष इर्शाद शेख, रविकांत होरे, मनोहर धुडसे, रमेश येरेवार, काशिनाथ चिडे, प्रदीप भिवनकर, रवी वांढरे यासह ग्रामस्थांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आणि पुढिल यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. (aamcha vidarbha) (rajura)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top