Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, आवारपुर तर्फे सार्वजनिक वाचनालयाला स्पर्धा परीक्षा पुस्तके वितरित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी गडचांदूर (दि. २८ फेब्रुवारी २०२४) -         ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षे...

आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. २८ फेब्रुवारी २०२४) -
        ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून आपल करिअर घडवाव या साठी प्रत्येक गावात वाचनालय असणे महत्वाचे आहे. वाचनालयात वेळोवेळी बदलत्या अभ्यासक्रमानुसार पुस्तकांची गरज विद्यार्थांना जाणवत असते, ही बाब लक्षात घेऊन नांदा ग्रामपंचायत नी केलेल्या मागणी नुसार नांदा येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय ग्रामपंचायत नांदा ला आज अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, आवारपुर, व्दारे आदित्य बिर्ला सेंटर फॉर कम्युनिटी इनिशिएटिव्ह अँड रुरल डेव्हल्पमेंट अंतर्गत स्पर्धा परीक्षा तयारीची 48  पुस्तके वितरित करण्यात आली . 

      ग्रामीण भागातील गोरगरीब मुले वाचनालयात स्पर्धा परीक्षा तयारी करतात त्यांच्या अभ्यासात पुस्तकांची उणीव भासू नये व त्यांना यशाचं शिखर गाठून त्यांनी नांदा गावाच सुध्दा नाव लौकिक करावं असे प्रतिपादन नांदा ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर चटप यांनी केले.

    प्रत्येक विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करून आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे. वेळोवेळी वाचनालय करीता लागणारी मदत आम्ही आमच्या परीने करण्याचा पूर्ण प्रयत्न करू असे प्रतिपादन प्रतीक वानखेडे (सी.एस.आर. प्रमुख) यांनी केले. स्पर्धा परीक्षा पुस्तक वितरण कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष मेघाताई नरेश पेंदोर, सरपंच ग्राम पंचायत नांदा, पुरुषोत्तम आस्वले, उपसरपंच ग्राम पंचायत नांदा, श्रीहरी केंद्रे, ग्राम विकास अधिकारी, नांदा प्रतीक वानखेडे, (सी.एस.आर) प्रमुख, रत्नाकर चटप, मंगला गायकवाड सदस्य ग्राम पंचायत नांदा, देविदास मांदाळे आदी मान्यवर उपस्थित होते. तर स्वामी विवेकानंद वाचनालय येथील स्पर्धा परीक्षा तयारी करणारे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. (aamcha vidarbha) (gadchandur)


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top