Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ॲड. वामनराव चटप यांना यावर्षी तिसऱ्यांदा जीवनगौरव पुरस्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले अभिनंदन आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २९ फेब्रुवारी २०२४) -          शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेत...

शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले अभिनंदन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २९ फेब्रुवारी २०२४) - 
        शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ॲड. वामनराव चटप (Former MLA Adv. Wamanrao Chatap) यांना यावर्षी तिन प्रतिष्ठित संस्थांनी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. याबद्दल शेतकरी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ॲड. चटप यांचे अभिनंदन केले आहे. (jivan gaurav puraskar)

        ॲड.वामनराव चटप यांनी कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर वकिलीचा व्यवसाय सुरू केला. वडील शेतकरी असल्याने शेतक-यांच्या प्रश्नांची त्यांना जाण होती. म्हणूनच सन १९८२ पासून त्यांनी शेतकरी संघटनेचे कार्य सुरू केले. शेतक-यांच्या प्रश्नासाठी शरद जोशी यांच्या सोबत हिरिरीने भाग घेऊन विविध आंदोलनाचे नेतृत्व केले आणि २१ दिवस तुरूंगवासही पत्करला. दरम्यान तिन वेळा ॲड. चटप हे राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार होते. या काळात राजुरा, कोरपना, गोंडपिपरी व जिवती या तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात विकासकामांसाठी निधी खेचून आणला आणि राजुरा विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून टाकला. विधानसभेत विविध आयुधांचा अचूक वापर करीत शेतकरी, आदीवासी, बेरोजगार, महिला, गरीब अशा सर्वांच्या प्रश्नांना वाचा फोडली आणि सरकारला अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडले. तब्बल १५ वर्ष राजुरा क्षेत्राचा हा बुलंद आवाज विधानसभेत सतत दणाणत होता. 

        या ४० वर्षाच्या कार्यकाळात मंत्रीपद, खासदार साठी विविध पक्षाकडून अनेक प्रलोभने आली. मात्र साधन सुचितेचा आग्रह धरणा-या ॲड. चटप यांनी ती धुडकावून लावली. आपल्या कार्याप्रती निष्ठा, शेतक-यांच्या स्वातंत्र्यासाठी अहर्निश संघर्ष, प्रामाणिकपणे कार्य करण्याची आणि जनतेला न्याय मिळवून देण्याची भुमिका यामुळे तावूनसुलाखून निघालेले त्यांचे नेतृत्व यामुळे स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाच्या नेतृत्वाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आणि अंत्यंत जुझारूपणे ते यासाठी विदर्भभर दौरा करून विदर्भावरील अन्यायाची गाथा, विविध समस्या निर्माण होण्याची कारणे आणि त्याचा एकमेव उपाय स्वतंत्र विदर्भ राज्य याविषयी आंदोलने व जनजागरण करीत आहेत. 

        ॲड.वामनराव चटप यांच्या या संघर्षशिल वृत्तीचा, कर्मठ नेतृत्व गुणांचा, बहुमुल्य कामगिरीचा आणि समाजाच्या उत्थानासाठी सतत झटणा-या कर्तृत्वाचा गौरव विदर्भातील तिन प्रसिध्द संस्थांनी जीवन गौरव पुरस्कार देऊन केला आहे. ॲड.वामनराव चटप यांना जीवन गौरव साहित्य परिवार, महाराष्ट्र या संस्थेतर्फे नागपूर येथील धनवटे नॅशनल महाविद्यालय येथे माजी कुलगुरू डाॅ.शरद निंबाळकर यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दुसरा जीवन गौरव पुरस्कार कोल्हापूर येथे पहिल्या नांगरट साहित्य संमेलनात कवी विठ्ठल वाघ व माजी खासदार राजु शेट्टी यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. तिसरा जीवनगौरव पुरस्कार वरोरा येथील धनोजे कुणबी समाज मंडळातर्फे देऊन सन्मान करण्यात आला. ॲड.वामनराव चटप यांच्या कार्याप्रती झालेल्या सन्मानाबद्दल शेतकरी संघटना आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीने त्यांचे अभिनंदन केले आहे. (aamcha vidarbha) (rajura)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top