Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रासेयो शिबिरातून विद्यार्थ्यांना सकारात्मक दिशा मिळते - आ.सुभाष धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी कोरपना (दि. ०७ फेब्रुवारी २०२४) -         रासेयो शिबिर हे विद्यार्थ्यांचा जीवनाला कलाटणी दे...

आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. ०७ फेब्रुवारी २०२४) -
        रासेयो शिबिर हे विद्यार्थ्यांचा जीवनाला कलाटणी देणारे असून विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कार निर्माण करणारे असतात. रासेयो शिबिरातून विद्यार्थ्यांना सकारात्मक दिशा मिळते. असे प्रतिपादन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे (MLA Subhash Dhote)  यांनी केले. (Mahatma Gandhi College of Science)

        जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी अंतर्गत येत असलेल्या आसन बूज. येथे गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्सच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठल थीपे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष विकास भोजेकर, सचिव धनंजय गोरे, संचालक रामचंद्र सोनपितरे, प्राचार्य शैलेंद्र देव, उपसरपंच आशिष देरकर, ग्रा. पं. सदस्य लक्ष्मण चिकराम, मुख्याध्यापिका नंदा येसेकर आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन रासेयो अधिकारी डॉ. संदीप घोडीले यांनी केले तर आभार मनोहर बांदरे यांनी मानले.. (aamcha vidarbha) (korpana) ((gadchandur shikshan prasarak mandal) (Vitthal Theepe))

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top