Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: श्री सिद्धेश्वर मंदिर समूह जतन-संवर्धन कामाचा ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते शुभारंभ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
८ फेब्रुवारी ला सुधीरभाऊ सिद्धेश्वरला देणार भेट आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा (दि. ०७ फेब्रुवारी २०२४) -         तालुक्याच्या शेवटच्या टो...

८ फेब्रुवारी ला सुधीरभाऊ सिद्धेश्वरला देणार भेट
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. ०७ फेब्रुवारी २०२४) -
        तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या प्रसिद्ध सिद्देश्वर येथील महादेवाच्या यादवकालीन पुरातन हेमाडपंथी श्री सिद्देश्वर मंदिराचा जीर्णोद्धार व पुनर्निर्माण करण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी पहिला टप्पा १४.९३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून कामाचा शुभारंभ ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज (दि.८) दु.३ वा. सिद्धेश्वर मंदिर परिसरात संपन्न होणार आहे. (Sudhir Mungantiwar, Minister of Forests, Cultural Affairs and Fisheries and Guardian Minister of the district)

        यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार रामदास आंबटकर वि.प.स., आमदार सुधाकर अडबाले वि.प.स., आमदार अभिजित वंजारी वि.प.स., आमदार सुभाष धोटे राजुरा वि.सभा (MLA Subhash Dhote), विकास खारगे (भा.प्र.से.) मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विभाग, विनय गौडा जिल्हाधिकारी (भा.प्र.से.) चंद्रपूर, तेजस गर्गे संचालक पुरातत्त्व विभाग मुंबई, श्री संत स्वामी चैतन्य महाराज वढा, माजी आमदार अँड. संजय धोटे (Former MLA Sanjay Dhote), सुदर्शन निमकर (Sudarshan Nimkar), माजी जिप अध्यक्ष देवरावदादा भोंगळे (Devravdada Bhongle), सिद्धेश्वर मंदिर जतन दुरुस्ती देखरेख व संनियंत्रण समिती, श्री मयुरेश खडके सहा.संचालक पुरातत्त्व विभाग, नागपूर व रवींद्र माने उपविभगिय अधिकारी राजुरा यांची उपस्थिती राहणार आहे. 

        मागील अनेक वर्षांपासून या पुरातत्व मंदिराची भग्नावस्था झाली होती. परिसरातील जनतेनी केलेल्या मागणी नुसार माजी आमदार निमकर यांच्या पाठपुराव्यामुळे ना.मुनगंटीवार यांनी दिलेला शब्द पूर्ण करत पहिल्या टप्प्यात १५ कोटी रु निधी मंजूर केला. या जागृत व ऐतिहासिक अश्या या पवित्र देवस्थानात भाविकांची मोठी श्रद्धा व विश्वास असल्याने या मंदिरात श्रावण महिन्यात व शिवरात्रीला मोठी जत्रा भरत असते. या मंदिरात महाराष्ट्रातील तसेच नजीकच्या तेलंगणातील भाविकांची मोठी गर्दी असते. डोंगरच्या पायथ्याशी निसर्गरम्य मनमोहक असे हे मंदिर आहे. यात हेमाडपंथी श्री सिद्देश्वर मंदिराच्या बारा ज्योतिर्लिंग मंदिरांच्या पुनर्निर्माना सह विविध विकास कामे करण्यात येणार आहे. यापैकी मंदिराचे जतन दुरुस्ती च्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार असून या सोहळ्याला श्री संत स्वामी चैतन्य महाराज वढा यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त भाविक भक्तांनी व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आव्हान जतन दुरुस्ती देखरेख समिति सदस्य तथा सरपंच शंकर मडावी, श्री सिध्देश्वर शिवालय देवस्थान कमिटी सिद्धेश्वर चे अध्यक्ष राधेश्याम कुर्मावार, सचिव किरण चेनमेनवार, उपाध्यक्ष विजय नामेवार, सदस्य दिलीप वांढरे, श्रीनिवास मंथनवार, सतिष कोमरपेल्लीवार, जयराम फड, हनुमान प्रसाद तिवारी, नागोराव उमरे, रमेश दयालवार, संतोष आत्राम यांनी केले आहे.

        तत्पूर्वी ०६ फेब्रुवारीला माजी जिप अध्यक्ष देवरावदादा भोंगळे यांनी मंदिर परीसरास भेट देऊन याठिकाणच्या भुमिपुजन सोहळ्याची जय्यत तयारीची पाहणी केली; प्रसंगी उत्तम नियोजनाच्या दृष्टीने आयोजक तथा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांना अनेक आवश्यक सुचना केल्या. यावेळी तालुका महामंत्री दिलीप वांढरे, सतिश कोमरवेल्लीवार, विनोद नरेन्दुलवार, देवस्थान ट्रस्टचे राधेशाम कुरमावार, विजय नामेवार, प्रदिप हिवरकर यांची उपस्थिती होती. (aamcha vidarbha) (rajura)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top