अगोदर करावी लागणार नोंदणी व टोकन मिळाल्यावरच न्यायचे आहे केंद्रावर
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 07 फेब्रुवारी 2024) -
राजुरा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या तुलाना येथील किसान जिनिंग आणि खामोना येथील गणेश कोटेक्स येथे सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (सीसीआय)चे अधिकारी एच.बी. पटेल, अमरीश पटेल, राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विकास देवाळकर, संचालक उमाकांत धांडे, अँड. अरुण धोटे, संतोष इंदूरवार, विनोद झाडे, लहू बोंडे, सरिता रेड्डी, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव मोनिका मेश्राम, पराग बोढे, विजय कोंडावार यांनी जिनिंगला भेट देऊन यंत्रणेचे निरीक्षण करत समाधान व्यक्त केले. या जिनिंग मध्ये सीसीआय नियमावली व शासनाने जाहीर केलेल्या हमी भावानुसार कापूस खरेदी करण्यात येणार आहे. परंतु परिसरातील सीसीआई अंतर्गत येणाऱ्या या प्रसिद्ध जिनिंग मध्ये कापूस विक्रीसाठी आणण्यापूर्वी शेतकऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे. 7 फेब्रुवारीपासून सीसीआयकडून टोकन पद्धतीने कापूस खरेदी करण्यात येत आहे. कोणत्याही व्यक्तीने टोकन न घेता कापूस गाडीत भरून विक्रीसाठी आणू नये, कापूस विकायचा असेल तर आधी बाजार समितीकडून टोकन घ्यावे लागणार आहे, टोकन घेतल्याशिवाय कापूस विकू नये, नोंदणी केल्यानंतरच टोकन दिले जात असून टोकनवर लिहिलेल्या तारखेलाच कापूस विक्रीसाठी आणावा लागणार आहे, सीसीआय कापूस खरेदी हंगाम संपेपर्यंत सुरू राहणार असून शेतकऱ्यांनी कापूस विक्रीची घाई करू नये. असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ, बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांना केली आहे. शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी कापूस खरेदी बंद राहणार आहे हे येथे विशेष. यावेळी जिनिंगचे संचालक सेठ राधेश्यामजी अडानिया, सीए सागर अडानिया, मनमोहनजी सारडा यांची उपस्थिती होती. (aamcha vidarbha) (rajura) (Cotton Corporation of India Limited (CCI))
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.