Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दुचाकीच्या डिक्कीतून अडीच लाख उडविले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मुख्य बाजारपेठेतील दुपारची घटना आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. ५ फेब्रुवारी २०२४) -         शहरात मुख्य बाजारपेठेत दुचाकीच्या डिक्कीतू...

मुख्य बाजारपेठेतील दुपारची घटना
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ५ फेब्रुवारी २०२४) -
        शहरात मुख्य बाजारपेठेत दुचाकीच्या डिक्कीतून अडीच लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली असून चोरीच्या संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये रिकॉर्ड झाला आहे. 

         काँग्रेस नेते व पंचायत समितीचे माजी सभापती संतोष चन्ने हे दुपारी १२ वाजताच्या सुमारास मुख्य बाजारपेठेतील हाजी गुलाम हुसेन यांच्या हार्डवेअर दुकानात दुचाकीने दुपारी बारा वाजताच्या सुमारास आले. दुकानासमोर दुचाकी उभी करत त्यांनी डिक्की उघडली आणि डिक्कीतून पाण्याची बॉटल काढून पाणी प्यायले व डिक्की मधून एका पिशवीतून नोटांचे एक बंडल मधून एक बंडल काढून बाकीची रक्कम पिशवीसह डिक्कितच ठेवत दुकानात गेले. याच दरम्यान मास्क लावून एक युवक त्यांचा दुचाकी जवळ येऊन दुसऱ्या दुचाकीजवळ येऊन बसला इकडे तिकडे बघत त्याने काही सेकंदांकरिता मास्क हि हटविला व नंतर त्याने पुन्हा मास्क तोंडावर चढवत दुचाकीच्या इग्निशन मध्ये काहीतरी टाकत डिक्की उघडली व अडीच लाख रोकड असलेली पिशवी काढून पसार झाला. चन्ने हे घरी गेल्यावर त्यांनी पैसे काढण्यासाठी डिक्की उघडली मात्र त्यातील पैशाची पिशवी चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ हार्डवेअर दुकान गाठत तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका युवकाने केलेला चोरीच्या संपूर्ण व्हिडिओच समोर आला, याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. (aamcha vidarbha) (rajura)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top