Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नांदाफाटा येथे भव्य हळदी कुंकु कार्यकमाचे कार्यक्रम संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मकर संक्रांति निमित्ताने कोरपना तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजन आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी गडचांदूर (दि. ०...

मकर संक्रांति निमित्ताने कोरपना तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजन
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. ०७ फेब्रुवारी २०२४) -
        तालुक्यातील नांदा फाटा येथे तालुका महिला काँग्रेस कमिटी कोरपना व्दारा सांस्कृतिक भवन नांदाफाटा येथे हळदी कुंकु कार्यकमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची अध्यक्षा सौ. शुभांगीताई सुभाषराव धोटे आणि उद‌घाटक राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे होते ((MLA Subhash Dhote) ). विशेष अतिधी म्हणून सौ. सविताताई टेकाम, न.प. अध्यक्षा, गडचांदूर, सौ. नंदाताई विजयराव बावणे, अध्यक्ष नगर पंचायत कोरपना, सौ. रोहिणीताई अरुण धोटे, सौ. विणाताई मालेकर, माजी जि.प. सदस्य चंद्रपूर, सौ. कल्पनाताई उत्तम पेचे, माजी जि.प. सदस्य चंद्रपूर, सौ. आशा खासरे, कोरपना तालुका कांग्रेस महिला अध्यक्षा, वंदना बल्की मंचावर उपस्थित होत्या. (Organized by Korpana Taluka Mahila Congress Committee on the occasion of Makar Sankranti)

        आमदार सुभाष धोटे ने मकर संक्रांति निमित्ताने आयोजित हळदी कुंकू महिला उत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येत उपस्थित महिलांना मकर संक्रांति सणाचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले. 'तिळ-गुळ खा आणि गोड गोड बोला' असे म्हणत सर्व कार्यकरत्यांना आपले आपसी वाद विसरून मिळून काम करण्याचे आवाहन केले. महिलांच्या आग्रहास्तव या आयोजनात उखाणे स्पर्धा व महिला समुह नृत्यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला ज्यात मोठ्या संख्येत महिलांनी भाग घेतला.

        कार्यक्रमाचे आयोजन तालुका महिला काँग्रेस कमिटी कोरपना च्या वतीने करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सुभाष धोटे यांनी सौ. आशाताई खासरे आणि सौ. सविता टेकाम सहित महिलांचे विशेष आभार व्यक्त केले. उपस्थित सर्व महिलांना कोरपना तालुका महिला काँग्रेस कमिटी च्या वतीने भेट स्वरूप प्लास्टिकच्या कुंडी देण्यात आल्या. (aamcha vidarbha) (nandaphata)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top