Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: रामपूर येथे हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सरपंच निकिता रमेश झाडे यांच्या पुढाकाराने महिला शक्ती आली एकत्र आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजुरा (दि. 09 फेब्रुवारी 2024) -         तालुक्या...

सरपंच निकिता रमेश झाडे यांच्या पुढाकाराने महिला शक्ती आली एकत्र
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. 09 फेब्रुवारी 2024) -
        तालुक्यातील रामपूर येथे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रामपूर ग्रामपंचायतच्या कार्यक्षम सरपंच सौ. निकिता रमेश झाडे (nikita ramesh zade) यांच्या पुढाकाराने रामपूर मधील महिला शक्ती एकत्र आली. या कार्यक्रमाला अभूतपूर्व हजारोच्या संख्येने महिलांचा सहभाग बघायला मिळाला. विविध उपक्रमासह रामपूर येथे महिलांनी सहभाग घेत अतिशय स्तुत उपक्रम घडवून आणला. आपले मनोगत व्यक्त करताना सौ निकिता रमेश झाडे यांनी सर्व महिलांचे आभार मानले. याप्रसंगी प्रामुख्याने वंदनाताई वामनराव चटप, मनीषाताई चटप, गोवरीच्या सरपंच आशाताई बबन उरकुडे, सुरेखाताई बोंडे, ग्रापं सदस्य वैशालीताई लांडे, ग्रापं सदस्य रेखा आत्राम, ग्रापं सदस्य संतोषी दुधे, ग्रापं सदस्य मंजुषा लांडे, ग्रापं सदस्य गौरी चोकारे, ग्रापं सदस्य माया करलुके, मायाताई मालेकर, सिंधुबाई लांडे, मैनाबाई रोगे, शितल बानकर, पुष्पा ढवस, गिरी ताई, उरकुंडे आजी, शैलाताई उरकुडे,  गणपती चौधरी, मोनिका लांडे, किरण विरुटकर, सुवर्णाताई झाडे, शोभा बोबडे, वर्षाताई कुडे, शेंडेताई, किरण लांडे, सुमन बोबडे, गौरकारताई, निखोडेताई, कोवेताई, मयुरी आस्वले, आशा वर्कर स्टॉप आणि हजारोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या. अत्यंत शांततेत व उत्साहात संपन्न झाला, कार्क्रमाला महिलांनी अलोट गर्दी केली होती, सरपंच निकिता झाडे यांच्या यांच्या वतीने महिलांना हळदी कुंकू व वाण वाटप करण्यात आले, महिलांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिल्याबद्दल सरपंच निकिताताई रमेश झाडे यांनी उपस्थित सर्व महिला भगिनींचे आभार मानले. (aamcha vidarbha) (rampur) (rajura) (haldi kunku)


Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top