Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: मोदी सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा; गाव चलो अभियानातून देवराव भोंगळे यांचे देवाळावासीयांना आवाहन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मुक्कामी राहून विविध संघटनात्मक कार्यक्रमं आणि गावकऱ्यांच्या भेटी घेत साधला संवाद. आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. १६ फेब्रुवारी २०२४) ...

मुक्कामी राहून विविध संघटनात्मक कार्यक्रमं आणि गावकऱ्यांच्या भेटी घेत साधला संवाद.
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १६ फेब्रुवारी २०२४) -
        देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या विकसित भारत संकल्पाचा संदेश तसेच केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या लोककल्याणकारी योजनांची तसेच देशहितांच्या निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी दि. १५ व १६ फेब्रुवारी रोजी राजुरा विधानसभा क्षेत्रातील मौजा देवाडा (ता. राजूरा) येथे विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांनी गाव चलो अभियान करून नागरीकांना मोदी सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. (Assembly Election Chief Devrao Bhongle) (gaon chalo abhiyan)

        या अभियानादरम्यान त्यांनी स्थानिक मल्लिकार्जुन मंदीरात दर्शन घेऊन गावातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या भेटी घेतल्या, गावातील जुन्या जेष्ठ कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन आस्थेने विचारपूस केली. गावातील विविध क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिंच्या भेटी घेत त्यांना मोदी सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक राममंदिरात आयोजित बुथ बैठकीत विविध संगटनात्मक कार्यक्रमांचा आढावा घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. प्रसंगीच उपस्थितांकडून (namo app ) नमो ॲप डाऊनलोड करून घेत नवमतदारांच्या नोंदण्याही करण्यात आल्या. बुथ बैठकीनंतर कार्यकर्त्यांसह सामुहिक भोजन करून  देवराव भोंगळे यांनी देवाळ्यातच कार्यकर्त्याच्या घरी मुक्काम केला. 

        दुसर्‍या दिवशी सकाळी 'फिर एक बार मोदी सरकार' (fir ek bar modi sarkar) या घोषणेचे ठिकठिकाणी दिवार लेखन करत मंदिरात साफसफाई केली; गावातील विविध प्रतिष्ठाने, डाकघर, कृषि केंद्र, रेशन दुकान, पिएमश्री. जि. प. शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा विविध ठिकाणी भेटी देऊन स्थानिक पातळीवरील विविध विषयांवर चर्चा केली; शाळकरी विद्यार्थ्यांशी हितगुज साधली. प्रसंगीच प्रा.आ.केन्द्रातील सुखसोयींचीही पाहणी करून आवश्यक सुचना केल्या.

        यावेळी जेष्ठ कार्यकर्त्या धृपदाबाई मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, तालुका महामंत्री दिलीप वांढरे, वामन तुराणकर, माजी पं. स. सदस्या सौ. मंजुषाताई अनमुलवार, सरपंच शंकर मडावी, उपसरपंच सत्यवा बोकुंर, सुरेश रागीट, विनोद नरेन्दुलवार, सिनु मंथनवार, शिवा बोंकुर, सुरेश धोटे, पोचय्या जेल्लावार, सुभाष तेल्लीवार, सुनिल आत्राम, सुमा आफरीन, विनोद नामेवार, अजय राठोड, छबिलाल नाईक, आकाश गंधारे, अभिजित कोंडावार, राजकुमार मेकलवार, तिरूपती जिट्टापेनवार, भाष्कर गोडशेलवार, शंकर मेश्राम, शशिकला डोहे, बालाजी दुर्गे, शंकर राठोड, सिनू ओलोजवार, श्रीराम केंद्रे, विष्णु घुले आदिंसह नागरिकांची उपस्थिती होती. (aamacha vidarbha) (rajura) (BJP)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top