Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गडचांदूर येथे सतगुरु सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते सतगुरु सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन समाजाती...

ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते सतगुरु सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन
समाजातील सेवानिवृत्त कर्मचारी, आदर्श शिक्षक व कर्तृत्ववान नागरिकांचा सत्कार
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. १७ फेब्रुवारी २०२४) -
        स्थानिक सद्गुरु सेवालाल महाराज बंजारा समाज संस्थान व येथील समस्त बंजारा समाज बांधवांच्या सहकार्याने गुरुवार दि.15 फेब्रुवारी ला शहरात बंजारा समाजातील क्रांतिकारी विचाराचे आदर्श दैवत मानले जाणारे सद्गुरु सेवालाल महाराज यांची 285 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

        कार्यक्रमात केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भेट देऊन सतगुरु सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मार्गदर्शन केले. या वेळी भाजप शहर अध्यक्ष सतीश उपलेंचीवार, युवा नेता निलेश ताजने उपस्थित होते. बंजारा समाजातील महिलांनी सांस्कृतिक वेशभूषा, नृत्य व गीत गायन सादर केले.

        सदर कार्यक्रम सद्गुरु सेवालाल महाराज बंजारा समाज संस्थान गडचांदूर चे अध्यक्ष हितेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समाजाचे मार्गदर्शक पांडुरंग जाधव, संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर, बाबू मोतीराम पवार संचालक अभिषेक विद्यालय चिखली खुर्द, राम पवार, संचालक आश्रम शाळा शेणगाव, अण्णाराव आडे, आर.सी. पवार, संतोष राठोड, एम.डी. चव्हाण, एन.के. जाधव, पांडुरंग पवार, समाजातील वरिष्ठ नागरिक बाळू जाधव, दत्ता शेरे, बंडू राठोड, गोविंद पवार, विनायक राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत जयंती सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमात समाजातील महिला, पुरुष, बालके मोठ्या संख्येने सहभागी झाले. या प्रसंगी समाजातील काही कर्तृत्ववान नागरिकांचा सन्मान करण्यात आला. सेवानिवृत्त कर्मचारी सुधाकर पवार, देविदास नंदू पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सहकारी पतसंस्थेत निवडून आलेल्या बंजारा समाज बांधवांचा पण सत्कार करण्यात आला. यात यशोदाबाई पांडुरंग जाधव यांचा सत्कार करण्यात आला. तसेच बंजारा समाजातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक बंडू राठोड, राजेश पवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील नवनियुक्त कर्मचारी बांधवांचे सत्कार करण्यात आले. त्यात श्रीनिवास मारुती चव्हाण (के इ एम हॉस्पिटल मुंबई), राजेश दत्ताजी शेरे व कु.परी शिवाजी राठोड यांचा सत्कार करण्यात आला. 

        जंयती सोहळा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सद्गुरु सेवालाल महाराज बंजारा समाज संस्थान चे उपाध्यक्ष रामचंद्र पवार, सचिव उत्तम जाधव, सहसचिव अशोक जाधव, कनिराम पवार, सदस्य माधव पवार, कैलाश पवार, देविदास पवार, सुभाष जाधव, दिलीपकुमार राठोड, शिवाजी राठोड, शंकर राठोड, उल्हास पवार, वामन जाधव महाराज तथा समस्त बंजारा बांधवांचे मोलाचे योगदान लाभले. 

        संचालन विनोद चव्हाण यांनी तर प्रस्ताविक दिलीप कुमार राठोड आणि संस्थांन चे कार्याध्यक्ष यांनी आपले कार्यविशद केले. उपस्थित समाज बांधवांना मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. माधव पवार नी लेखाजोखा मांडला. आभार उल्हास पवार सर यांनी केले. या वेळी गडचांदूर नगरीतील समस्त समाज बांधव पारिवारासह सस्नेह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. (aamcha vidarbha) (gachandur) (banjara samaj)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top