Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: दानशूर अनिल रमगिरवार यांचा सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सिद्धेश्वर मंदीराला २० लक्ष किमतीची एक एकर जमीन दान आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. १६ फेब्रुवारी २०२४) -         तालुक्यातील देवाडा ये...

सिद्धेश्वर मंदीराला २० लक्ष किमतीची एक एकर जमीन दान
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १६ फेब्रुवारी २०२४) -
        तालुक्यातील देवाडा येथे प्रसिद्ध सिध्देश्वर महादेवाचे यादवकालीन पुरातन हेमाडपंथी मंदिर आहे. या देवस्थानाला लागूनच असलेली अनिल सुधाकरराव रामगिरवार (Anil Sudhakarrao Ramgirwar) यांची वीस लक्ष रुपये किंमतीची एक एकर जमीन देवस्थानला दान स्वरूपात दिली. या दानशूर व्यक्तींचा सत्कार नुकताच जतन दुरूस्ती व पुर्णनिर्माणाच्या भूमिपूजन सोहळ्यात पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार (Guardian Minister Sudhirbhau Mungantiwar) यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला आहे. (Siddheshwar Temple Dewada)

        पुरातत्व विभागांतर्गत येत असलेल्या सिध्देश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करताना त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊन काम करता येत नाही. अनिल रामगिरवार यांचे शेत मंदिराला लागूनच असल्यामुळे ही जमीन देवस्थानला दान दिल्याने या जमिनीवर मंदिराचे सभागृह बांधकाम करणे, धार्मिक विधिकार्य करण्यासाठी लागणाऱ्या  बांधकामासाठी व अन्य कार्यासाठी फायदा होणार आहे. तेलंगणा व महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असलेल्या या मंदिरात श्रावण महिन्यात व मार्गशीर्ष महिन्यात भाविकांची मोठ्या प्रमाणत गर्दी असते. नुकतेच १४ कोटी ९३ लक्ष रुपये किंमतीच्या कामाचे भूमिपूजन केले असून दुसरा टप्प्याला प्रशासकीय मान्यता मंजूर होत असून अनेक कामे प्रस्तावित आहे. या देवस्थानाला मिळालेल्या जमिनिमुळे मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यास जागा मिळणार आहे.

        समाजामध्ये दिवसेंदिवस सामाजिक दायित्व जोपासणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसून येत आहे. त्यात जमीन दान देणे ही प्रवृत्ती आजच्या काळात नाहीशी झाली. मात्र अशा सामाजिक दायित्व जोपासत दानशूर प्रवृत्ती असलेल्या अनिल रामगिरवार यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र त्यांचे आभार मानले जात आहे. (aamacha vidarbha) (rajura)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top