Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ताबेदारालाच जामिनिचा मोबदला दया अन्यथा एक इंच ही जमीन प्रकल्पाला देऊ नका : विजय ठाकरे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अल्ट्राटेक सीमेंट करिता मारकागोंदी येथे ५४ हेक्टर वन जमीनीचे आवंटन  आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी  गडचांदूर (दि. २० फेब्र...

अल्ट्राटेक सीमेंट करिता मारकागोंदी येथे ५४ हेक्टर वन जमीनीचे आवंटन 
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी 
गडचांदूर (दि. २० फेब्रुवारी २०२४) -
        गडचांदूर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी (माणिकगड सीमेंट) प्रकल्पासाठी जिवती तालुक्यातील मारकागोंदी येथे ५४.२५ हेक्टर क्षेत्रात लॅटेराइट खाण प्रस्तावित करण्यात आली आहे. लिजसाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या जमिनी आधीच भूमाफियांनी कवडीमोल भावाने विकत घेतल्या आहे, परंतु शेतावर ताबा मात्र अजूनही शेतकऱ्यांचाच आहे. त्यामुळे शुक्रवारी यासंदर्भात आयोजित जनसुनावणी दरम्यान भूमिमाफियांवरून चांगलाच गदारोळ झाल्याचे बघायला मिळाले.

        कोरपना तालुक्यातील माणिकगड युनिटसाठी जिवती तालुक्यात वन विभागाची जमीन शासनाने आवंटित केली असून, तसा अध्यादेश जिवतीच्या तहसीलदारांकडे धडकला. दरम्यान, या प्रकल्पाची भनक लागताच बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेण्याचा सपाटा काही राजकीय नेत्यांच्या शिष्यांनी सुरू केला होता. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नाममात्र रक्कम देऊन हडपण्याची चर्चा होत आहे.  दरम्यान, शुक्रवारी या खाण प्रकल्पासाठी सुनावणीदरम्यान भूमाफियांचा हा खटाटोप समोर आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. भु-माफिया यांना एक इंच जामिनीचे पैसे मानिकगढ़ कंपनी ने दिले तर शेतकरी संकटात येईल आणि म्हणून कुणाकडे जामिनीचे पट्टे असतील किव्हा नसतील तरी आज रोजी जो कास्तकार जामिनिचा ताबेदार आहे त्यालाच जामिनिचा मोबदला दया अन्यथा प्रकल्पाला एक इंच ही जमीन देऊ नका अशा प्रकारची विनंती जनसुनवाई त उपस्थित कास्तकारास व जिल्हाधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते विजय ठाकरे यांनी केली. ह्य  समस्येकडे दुर्लक्ष केल्यास स्वता कास्तकाराची बाजू माननीय उच्चतम न्यायालय येथे मांडनार असल्या बाबत विजय ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास भविष्यात भूमाफिया आणि जमीन कसणारे शेतकरी यांच्यात संघर्ष उभा राहण्याची शक्यता वाढली आहे. (aamcha vidarbha) (korpana)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top