Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तीन आमदारांची उपस्थिती आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी  गडचांदूर (दि. २० फेब्रुवारी २०२४) -         नगरपरिषद गडचांदूर व आमद...

तीन आमदारांची उपस्थिती
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी 
गडचांदूर (दि. २० फेब्रुवारी २०२४) -
        नगरपरिषद गडचांदूर व आमदार सुभाष धोटे यांच्या पुढाकाराने गडचांदूर येथील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शिवजयंतीच्या निमित्ताने पार पडले.

           पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर उपस्थित होत्या. लोकार्पण आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. तर विशेष अतिथी म्हणून शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा प्रमुख अरुण निमजे, नगराध्यक्ष सविता टेकाम, राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यावेळी मंचावर उपस्थित होते.

             शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापन केल्यामुळे शहराच्या सौंदर्यात वाढ झालेली आहे. गडचांदूर शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही याप्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी दिली. याप्रसंगी शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (aamcha vidarbha) (korpana)


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top