Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शिक्षणासोबत क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रांतही विद्यार्थ्यांचे भविष्य - अभिजित धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदूर बिट स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात थुटरा शाळा ठरली मैदानी व जनरल चैंपियन आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी  गड...

गडचांदूर बिट स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात थुटरा शाळा ठरली मैदानी व जनरल चैंपियन
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी 
गडचांदूर (दि. २० फेब्रुवारी २०२४) -
        शिक्षण हे समाजसुधारनेचे प्रभावी माध्यम आहे. समाजाच्या उत्थानासाठी महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपले आयुष्य वेचले व शिक्षणाची दारे सर्वांना खुली केले. या शिक्षणातुन संवेदनाशील माणुस घडला पाहिजे, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य केल्यास विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य आहे असे प्रतिपादन सेवा कलश फाऊंडेशन चे अध्यक्ष अभिजित धोटे यांनी केले. जिल्हा परिषद शाळा खिर्डी येथे गडचांदूर बीट स्तरीय शालेय बाल क्रीडा तथा सांस्कृतिक महोत्सवाच्या आयोजन प्रसंगी ते बोलत होते.

        तालुक्यातील गडचांदूर बीटअंतर्गत शालेय बालक्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा नुकत्याच जि. प. उच्च प्राथमिक शाळा खिर्डी येथे पार पडल्या. या स्पर्धेतील बीटातील 22 शाळांनी सहभाग घेतला होता. दरम्यान जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, थुटरा उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करीत मैदानी व जनरल चैंपियनशिपचा बहुमान पटकाविला. बीटस्तरीय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेत जनरल चॅम्पियन्स ट्रॉफी, माध्यमिक चॅम्पियन्स जि.प. शाळा  थुटरा, प्राथमिक चॅम्पियन्स जि.प. शाळा कढोली खुर्द, सांस्कृतिक चॅम्पियन्स जि.प. शाळा आसन खुर्द शाळेने पटकाविला आसन खुर्द शाळेला सलग तिसऱ्या वर्षी सांकृतिक स्पर्धेचं प्रथम क्रमांक पटकावत सर्वोत्तम कामगिरी केली.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्यामराव सलाम तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सचिन कुमार मालवी गट शिक्षणाधिकारी यांची उपस्थित होती. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष उपसरपंच दिपक खेकारे, प्रमुख अतिथी म्हणून पावन श्रीवास्तव, केंद्रप्रमुख पंढरी मुसळे, ग्राम पंचायत सदस्य रमेश पाल, सदस्या आशा शेरकी, गीता पेंदोर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भिवसन कुमरे, पोलीस पाटील रामदास तोडासे, शुभकांत शेरकी, चंद्रकांत पांडे, रावजी आत्राम, किन्नाके, ज्योत्स्ना येनूरकर, पुनमकुमार अर्जापुरे, राजू सलाम, अनुसया कोटनाके, जयराम तुराणकर, ग्रामसेविक गुंजा उईके तथा बिटातील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.

        यावेळी स्वागताध्यक्ष दिपक खेकारे उपसरपंच ग्रा.पं. खिर्डी यांनी आपल्या आवडिच्या क्षेत्रात पुढे जाण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रस्तावीक केंद्रप्रमुख पंढरी मुसळे  यांनी केले, संचालन गोविंदा पेदेवाड, यांनी केले तर आभार प्रदर्शन मेघराज उपरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जाणता राजा युवा मंडळ खिर्डी, शाळा व्यवस्थापन समिती खिर्डी येथील सर्व पदाधीकारी व ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले. (aamcha vidarbha) (korpana)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top