Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: व्हॉईस ऑफ मीडिया कोरपना तालुका कार्यकारणी जाहीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अध्यक्षपदी प्रमोद वाघाडे तर उपाध्यक्षपदी प्रमोद खिरटकर ची निवड आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी  कोरपना (दि. २० फेब्रुवारी २...

अध्यक्षपदी प्रमोद वाघाडे तर उपाध्यक्षपदी प्रमोद खिरटकर ची निवड
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी 
कोरपना (दि. २० फेब्रुवारी २०२४) -
        व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेची कोरपना तालुका कार्यकारिणी जाहीर झाली असून या संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरी चे नांदाफाटा बातमीदार प्रमोद वाघाडे, उपाध्यक्षपदी दैनिक महासागर चे तालुका प्रतिनिधी प्रमोद खिरटकर तर सरचिटणीसपदी दैनिक लोकमत चे नांदा फाटा बातमीदार रत्नाकर चटप यांची निवड करण्यात आली आहे. 

         'लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीचा' असे ब्रीद घेऊन राष्ट्रीय पातळीवर स्थापन झालेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेचे जाळे अवघ्या वर्षभरात महाराष्ट्रासह २१ राज्यांमध्ये पसरले आहे. संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय सरचिणीस चंद्रमोहन पुप्पाला, राज्य अध्यक्ष राजा माने व विदर्भ विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांच्या सूचनेवर कोरपना तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. या कार्यकारिणीत अध्यक्षपदी प्रमोद वाघाडे, उपाध्यक्षपदी प्रमोद खिरटकर, सरचिटणीसपदी रत्नाकर चटप, कार्यधक्षपदी धनराज सिंह शेखावत, उपाध्यक्षपदी सिद्धार्थ गोसावी, कोषाध्यक्षपदी प्रा.रवींद्र नगराळे, सल्लागारपदी रफिक शेख, संघटकपदी जयंत जेणेकर, सहसचिवपदी रवी बंडीवार, तालुका संघटकपदी हबीब शेख, मार्गदर्शक शिवाजी सेलोकर, तालुका सदस्य नितीन शेंडे, शंकर तडस, संदीप खिरटकर, विजय बोरडे, रविष शर्मा यांची नियुक्ती केली आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे. (aamcha vidarbha) (korpana)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top