Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गरिबीला दोष न देता मेहनत केल्यास यश नक्की मिळेल - ठाणेदार वाघमारे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
निरोप समारंभात बारावीच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आपले मनोगत आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी  कोरपना (दि. २० फेब्रुवारी...

निरोप समारंभात बारावीच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आपले मनोगत
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी 
कोरपना (दि. २० फेब्रुवारी २०२४) -
        सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. एमपीएससी व यूपीएससीच्या माध्यमातून विद्यार्थी जीवनात यशस्वी होऊ शकतो. गरिबीला दोष न देता विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत केल्यास इच्छाशक्तीच्या भरवशावर यश मिळवता येते असे प्रतिपादन गडचांदूर येथील पोलीस निरीक्षक राजकमल वाघमारे यांनी केले.

        गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून एमसीव्हीसी विभागाच्या प्रमुख प्रा. आरजु आगलावे, प्रा. नंदा भोयर उपस्थित होत्या. यावेळी बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली.

        कार्यक्रमाचे संचालन प्रा. विवेक पाल यांनी केले. प्रास्ताविक प्रा. आशिष देरकर यांनी केले तर आभार प्रा. माधुरी पेटकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व प्राध्यापक विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (aamcha vidarbha) (korpana)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top