Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: २०२३ मधील अतिवृष्टी व पुरपरिस्थितीने नुकसानग्रस्तांना मोबदला द्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा तालुका युवक काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २३ फेब्रुवारी २०२४) -         माहे जून, जुलै २०२३ मध्...

राजुरा तालुका युवक काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २३ फेब्रुवारी २०२४) -
        माहे जून, जुलै २०२३ मध्ये अति पावसामुळे, अतिवृष्टी व पुराची परस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकरी लोकांचे खूप नुकसान झाले होते. या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी आपल्या विभागाकडून या नुकसान भरपाईचे पंचनामे झाले होते. पण अजुनही ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून या विषयांचा तातडीने पाठपुरावा करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला द्यावा अशी मागणी राजुरा तालुका युवक काँग्रेसच्या वतीने राजुराचे तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गौड यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

        या प्रसंगी कृ.उ.बा.स. सभापती विकास देवाळकर, संचालक विनोद झाडे, भेंडवी चे सरपंच श्यामराव कोटणाके, उपसरपंच रमेश मडावी, राजुरा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष ईर्षाद शेख यासह नुकसानग्रस्त शेतकरी, युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (aamcha vidarbha) (rajura)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top