Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आ. सुभाष धोटेंच्या हस्ते मुठरा व कुकुडसाथ येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २१ फेब्रुवारी २०२४)          राजुरा तालुक्यातील मौजा मुठरा येथे सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एक चंद्...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २१ फेब्रुवारी २०२४) 
        राजुरा तालुक्यातील मौजा मुठरा येथे सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एक चंद्रपूर आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२३ - २०२४ अंतर्गत मुठरा ते खामोना पांदण रस्त्याचे बांधकाम करणे, नाल्याला संरक्षण भिंत बांधणे, स्मशानभूमी शेड चे बांधकाम करणे अंदाजे किंमत २४ लक्ष, मौजा कुकुडसाथ येथे रस्त्याचे मजबुतीकरण करणे, अंदाजे किंमत २० लक्ष रुपये निधीच्या विकासकामांचे भुमिपूजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आणि राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. 

             या प्रसंगी मुठरा येथे सरपंच करिश्मा बोबडे, उपसरपंच विश्रांती करमनकर, ग्रा. प. सदस्य ऋतूराज करमनकर, वर्षा ताकसांडे, शिवाजी बोबडे, किशोर पुणेकर, जितेंद्र जीवने रतन लांडे, प्रकाश जीवने, शांता दुर्गे, शिवाजी आगलावे, स्वप्निल देठे, सुनीता आवडे, नंदलाल निरांजने, रामदास जीवने, आबाजी बोबडे, शेख सर, अश्विनी जेनेकर, अंकुश कांबळे, मुरलीधर आत्राम, लक्ष्मण घुगुल, बया घोटेकर, कुकडसाथ येथे सरपंच शंकर आत्राम, ग्रा. प. सदस्य जयश्री गोरे, मिनाबाई आत्राम, वासुदेव बोधे, देवाजी आत्राम, अभिषेक गोरे, रमेश वडस्कर, भाऊराव सोयाम, राजेंद्र लोनगाडगे, हेराम लोनगाडगे, भाऊराव मुठ्ठलकर, पवन निमकर, जितेंद्र टेकाम, लक्ष्मण आत्राम, दादाजी मडावी, अनिस डोंगे, अरुण चहारे, धर्मराज ताजणे, सविता टेकाम, जयश्री वांढरे, स्वप्नील लाकडे, सुमित लोनगाडगे, शंकर खामनकर, उत्तम मुठ्ठलकर यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (aamcha vidarbha) (rajura)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top