Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: रोटरी उत्सवाचे थाटात उद्घाटन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनेक मान्यवरांची उपस्थिती २८ फेब्रुवारी पर्यंत चालणार रोटरी उत्सव रोटरी उत्सवावर मनसेचा आक्षेप आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २४ फेब्र...

अनेक मान्यवरांची उपस्थिती
२८ फेब्रुवारी पर्यंत चालणार रोटरी उत्सव
रोटरी उत्सवावर मनसेचा आक्षेप
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २४ फेब्रुवारी २०२४) -
        रोटरी क्लब राजुराच्या वतीने आयोजित राजुरा रोटरी उत्सवाचे उदघाटन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते २३ फेब्रुवारी ला थाटात करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, बामणवाडा सरपंच सौ भारतीताई पाल, रोटरी क्लब चे असिस्टंट गव्हर्नर नितेश जयस्वाल, शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिक राजेंद्र चांडक, रोटरी क्लब राजुराचे अध्यक्ष कमल बजाज, सचिव सारंग गिरसावळे मंचावर उपस्थित होते. (rotary utsav)

        रोटरी क्लब ही संस्था समाजातील तळागाळाच्या वर्गांना आधार देण्याचे काम करते. तसेच आरोग्याच्या क्षेत्रात रोटरीची भूमिका वाखाण्याजोगी आहे. पोलिओच्या निर्मूलनामध्ये रोटरीचा क्लबचा सिंहाचा वाटा असून रोटरी क्लब फक्त उच्च वर्गापुरता मर्यादित न राहता रोटरी ने तळागाळातील लोकांना लाभ कसा होईल असे उपक्रम राबवावे असे प्रतिपादन आमदार सुभाष भाऊ धोटे यांनी केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. रोटरी उत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी अनाथ आश्रमांच्या मुलांना मान्यवरांच्या हस्ते परीक्षा पॅड भेट म्हणून देण्यात आले. संचालन केतन जुनघरे यांनी केले. कार्यक्रमाला रोटरी क्लबचे सर्व सदस्य व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


        रोटरी क्लब वतीने अंगदनगर, बामनवाडा रोड, राजुरा येथे दिनांक २३ ते २८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत रोटरी उत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी ५ ते रात्री १०-३० पर्यंत हा उत्सव सुरू राहणार आहे. बामनवाडा येथे सुमारे १ लाख ५५ हजार वर्गफूट अशा विशाल मैदानावर हा रोटरी उत्सव सुरु झाला असून यात विविध प्रकारचे सुमारे १५० स्टाॅल्स राहणार आहेत. याठीकाणी विविध रंगारंग कार्यक्रम, मनोरंजन सामग्री, खेळ कार्यक्रम, स्वादिष्ट खाद्य पदार्थांचे स्टाॅल, फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स, गिफ्ट आयटम्स, घरपयोगी वस्तु, ऑटोमोबाईल्स, सौंदर्य प्रसाधन, संपत्ती, टूर्स ट्रवल्स, गृहपयोगी वस्तुही आहेत. येथे अनेक सेवाभावी संस्था, बचत गट, दिव्यांगांना यांना मोफत स्टाॅल देण्यात आले असून ग्रामीण भागात विकासाचे माॅडेलही येथे प्रस्तुत होणार आहे. या उत्सवाचे शाळकरी मुलांना निःशुल्क पासेस देण्यात आले आहे. राजुरा येथे पहिल्यांदाच या रोटरी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून नागरिक, शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होऊन आनंदाचा लाभ घेण्याचे आवाहन राजुरा रोटरी क्लबचे अध्यक्ष कमल बजाज, निखील चांडक, मयुुर बोनगिरवार, समीर चिल्लावार, अँड. जगजीवन इंगोले, आनंद चांडक, अमोल कोंडावार, अभिषेक गंपावार, सारंग गिरसावळे यांनी केले आहे.

रोटरी उत्सवावर मनसेचा आक्षेप
        शाळकरी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असताना उच्चशिक्षित लोकांचे समजल्या जाणाऱ्या रोटरी क्लब सारख्या सामाजिक संघटनेने विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा तोंडावर तब्बल ६ दिवस सायंकाळच्या वेळेस साउंड लावून व येणाऱ्या लोकांच्या कल्ल्यात परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा विचार करावयास हवा होता असा आक्षेप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष आदित्य भाके यांनी घेतला आहे. 
        रोटरी क्लब द्वारे आयोजित रोटरी उत्सवात वाजणाऱ्या साउंड सिस्टम ने परिसरातील अभ्यार्थी विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी रोटरी चा प्रत्येक सदस्य घेत आहे. रोटरी उत्सवाने विद्यार्थ्यांना लाभ मिळावा त्याकरिता प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना निःशुल्क पासेस देण्यात आले आहे. 
कमल बजाज, अध्यक्ष, राजुरा रोटरी क्लब
(aamcha vidarbha) (rajura)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top