Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: 'जेवढे जाईल पोटात तेवढेच घ्या ताटात' सांगण्याची वेळ येणे हे सुसंस्कृत समाजाचे दुर्दैव
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
JCI राजुरा रॉयल राबवित आहे "माझे स्वच्छ ताट अभियान'' लग्न समारंभ स्थळी जनजागृती आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. १२ फेब्रुव...

JCI राजुरा रॉयल राबवित आहे "माझे स्वच्छ ताट अभियान''
लग्न समारंभ स्थळी जनजागृती
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १२ फेब्रुवारी २०२४) -
        अन्नाचे महत्त्व साधुसंतांनी सांगितले आहे, संत गजानन महाराजांनी तर उष्ट्या पत्रावळीवरील शित खाऊन उष्टे न टाकण्याचा मंत्र दिला होता. मात्र मनुष्य प्राणी स्वतःमध्ये जास्त गुरफटलेला असल्याने फक्त स्वार्थात त्याला संताची वचन आठवतात. अन्य वेळी मात्र ते स्वतः भावे ते ते करावे स्वमर्जीने असा स्वैराचार सुरू आहे. खरे तर ''अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदिशा'' हे सर्वांना लागू असताना आम्ही मात्र ज्या अन्नाने पोट भरतो त्याची वारे माप नासाडी ही करत असतो. 

        गेल्या काही दिवसात विवाहादी कार्यात उष्टे टाकू नका असे सांगण्याची वेळ येणे हेच आमच्या सुसंस्कृत समाजाचे दुर्दैव आहे असे फलक लागत आहे आणि लागण्याची गरज निर्माण होणे हे सुदृढ व सुशिक्षित समाजाचे लक्षण नाही. म्हणून लोकांनी जेवढे जाईल पोटात तेवढेच घ्या ताटात, त्यामुळे कोणाची तरी एक वेळेची भूख भागू शकते, महिने लागतात पिकवायला आणि मिनिट लागतोय फेकायला अश्या आशयाचे जनजागृतीपर बॅनर प्रिंट करून JCI राजुरा रॉयल ने येथील नक्षत्र हॉल, सम्राट हॉल, बोंडे हॉल, ओम साई राम मंगल कार्यालय, धनोजे कुणबी सभागृहात लावत शुभकार्यात उपस्थित लोकांना याबद्दल सांगण्यातही येत आहे. यावेळी JCI रॉयलच्या अध्यक्षा स्वरूपा झंवर, संस्थापक अध्यक्षा जयश्री शेंडे, झोन ट्रेनर श्वेता जयस्वाल, स्मृती व्यवहारे, प्रफुल्ला धोपटे, लीना जांभुळकर, राधा धनपावडे, संगीता पाचघरे, नम्रता खनगन व शेकडो सदस्यता उपस्थित होत्या. (aamcha vidarbha ) (rajura) (JCI Rajura Royal)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top