Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, भाजपात जाणार?
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आम्ही काँग्रेसचे निष्ठावंत, आम्ही काँग्रेसमध्येच; लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : आमदार सुभाष धोटे आमचा विदर्भ - दीपक शर्मा मुंबई / चंद्र...

आम्ही काँग्रेसचे निष्ठावंत, आम्ही काँग्रेसमध्येच; लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : आमदार सुभाष धोटे
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
मुंबई / चंद्रपूर / राजुरा (दि. १२ फेब्रुवारी २०२४) -
        गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा चालू आहे. अशातच चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. त्यामुळे चव्हाण आता भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याविषयी बोलताना राज्यातील भाजपाचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, काँग्रेसचे अनेक लोकनेते आगामी काळात भाजपात येतील. (Congress) (Former Chief Minister Ashok Chavan resignation)

        अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी आमदारकीचाही (विधानसभा सदस्यत्वाचा) राजीनामा दिला आहे. तशी पत्रं त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिली आहेत. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर पटोले हे काँग्रेस हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांचा सोबत पुन्हा काही आमदार येत असल्याच्या चर्चेला उधाण आले असून वृत्तवाहिनीने राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी सुद्धा राजीनामा दिल्याच्या बातम्या आल्याने राजुरा विधानसभा क्षेत्रात राजकीय चर्चाना उधाण आले आहे. यावर प्रेस नोट प्रसिद्ध करून खंडन करण्यात आले आहे. 

        इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तसेच समाज माध्यमातून प्रसारित होणाऱ्या बातम्यातून काहीतरी खोडसाळपणा दिसून येत आहे. मी स्वतः आणि चंद्रपूर जिल्ह्य़ातील काँग्रेसचे सर्व आमदार हे काँग्रेसचे निष्ठावंत सैनिक आहोत. आमचे कुटुंब माझ्या वडिलांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे. मी अगदी युवा अवस्थे पासून काँग्रेस पक्षाचे काम करीत आलेलो आहे आणि सदैव काँग्रेस पक्षाचेच काम करीत राहणार आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाची विचारसरणी, गांधी परिवार, पुरोगामी विचारधारा यासह घट्ट बांधलेले आहोत. माझ्यासह चंद्रपूर जिल्ह्य़ातील कोणीही काँग्रेस आमदार भाजप मध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. प्रसारमाध्यमांतून प्रसारित होणाऱ्या बातम्या निराधार आणि खोडसाळ असून चंद्रपूर जिल्हातील माझ्या व काही काँग्रेस आमदारांबाबतचे वृत्त पुर्णपणे निराधार आहे. आम्ही सर्व काँग्रेसचे निष्ठावंत काँग्रेसमध्येच आहोत. कार्यकर्त्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये संपूर्ण चंद्रपूर जिल्हात काँग्रेसच्या बाजूने वातावरण असून चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा सह जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येण्याची पुर्ण शक्यता आहे अशी प्रतिक्रिया चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी दिली आहे. (aamcha vidarbha) (rajura) (MLA Subhash Dhote)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top