Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भाजपा महानगर जिल्हा बाजार मंडळ चंद्रपूरतर्फे राबविला 'गांव चलो अभियान'
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. १२ फेब्रुवारी २०२४) -         सन २०१४ ते २०२४ या दहा वर्षाच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १२ फेब्रुवारी २०२४) -
        सन २०१४ ते २०२४ या दहा वर्षाच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात सर्वच क्षेत्रात विकासाचा झेंडा रोवला. कृषी कल्याण,गरीब कल्याण,महिला सशक्तीकरण,प्रधानमंत्री आवास योजना,गडकिल्ल्यांचे व तीर्थक्षेत्रांचे संवर्धन,आरोग्यम धनसंपदा,देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा अशा अनेक क्षेत्रात मोदी सरकारने ऐतिहासिक कामगिरी करत आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उंचावले. मोदी सरकारलादेखील महाराष्ट्र राज्य सरकारनेही उत्तम साथ देत आपल्या राज्यात मोठा विकास केला.त्या विकास कार्याच्या धर्तीवर केंद्र व राज्य सरकारांची यशोगाथा तळागाळापर्यंत पोहचविलेले विकास कामे आणि योजनांची माहिती 'गांव चलो' अभियानांतर्गत आज महानगर जिल्ह्यातील बाजार मंडळाच्या भगतसिंग चौक,समाधी  वार्डात विविध क्षेत्रातील नागरिकांना घरोघरी सदिच्छा भेट देऊन विकास कामाची पत्रके वाटप करण्यात आली.

        यावेळी भाजपा महानगर जिल्हा सचिव राजेंद्र खांडेकर,अनूसुचित जमाती मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष धनराज कोवे,भाजयुमो महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार,शक्तीकेंद्र प्रमुख नकुल आचार्य,बुथ प्रमुख कार्तिक मुसळे,बुथ प्रमुख प्रसाद काटपाताळ,बुथ प्रमुख मयुर घरोटे,लक्ष्मण महालक्ष्मे,सागर घरोटे,प्रफुल कामडी,विवेक घरोटे,विशाल चांदेकर,प्रणय माणूसमारे, ओमकार घरोटे,साहिल घरोटे,अर्णव  घरोटे,अतुल घरोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. (aamcha vidarbha) (chandrapur) (JCI Rajura Royal)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top