Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: साखरी वाघोबा येथे जिल्हा युवा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. १२ फेब्रुवारी २०२४) -         संघर्ष युवा विकास मंडळा तर्फे मागील 24 वर्षांची परंपरा कायम राखत 10 फेब्र...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १२ फेब्रुवारी २०२४) -
        संघर्ष युवा विकास मंडळा तर्फे मागील 24 वर्षांची परंपरा कायम राखत 10 फेब्रुवारीपासून छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे जिल्हा युवा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन थाटात संपन्न झाले. या महोत्सव अंतर्गत जिल्हा स्तरीय टेनिस बॉल क्रिकेट सामने, सामूहिक एकल व द्वंद नृत्य स्पर्धा यांचे तसेच वेकोली बल्लारपूर क्षेत्र यांचे सौजन्याने मोफत आरोग्य चिकित्सा व रोगनिदान शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात येत आहे. क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार, 20,000/- रोख, द्वितीय पुरस्कार 15000/-रोख आणि तृतीय पुरस्कार 7000/- रोख आणि आकर्षक स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे तसेच नृत्य स्पर्धांसाठी सुद्धा 3000/-, 2000/-, 1000/- 700- रुपयां पासून एकूण 15000/- रुपयांची बक्षिसे व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहेत. (Sangharsh Yuva Vikas Mandal Sakhari Waghoba)

        कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य खुशाल बोंडे यांचे हस्ते करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोवनी कोळसा खाणीचे खान व्यवस्थापक सोलंकी साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी कॉलेजचे उप प्राचार्य डॉ. प्रा. राजेश खेराणी, साखरीच्या सरपंच कु. प्रणाली मडावी, पोलीस पाटील धर्मराज उरकुडे, मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हा किसान आघाडी भाजपा नेते राजू घरोटे, ग्राम पंचायत सदस्य अक्षय करमनकर, सौ. निराशा मडावी, सौ. शीतल उरकूडे, परीक्षक म्हणून सौ. नमिता वाटेकर, श्रीमती उज्वला जयपुरकर, सौ. प्रीती रेकलवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून उद्घाटन व नृत्य स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

        क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे यशस्वितेकरिता उपाध्यक्ष शेखर कावळे, कोषाध्यक्ष सुदर्शन बोबडे, आयोजन समिती अध्यक्ष चंद्रकांत लेडांगे, गजानन चोथले, टीम कॅप्टन राकेश उरकूडे, उपकप्तान अंकित कावळे, प्रज्वल चोथले, अमोल अडबाले, अक्षय जेनेकार, अनिल गोरे, गोलू लांडे, शुभम काटवले, कुणाल मडावी, सचिन मिलमिले, अमोल गोरे, अमित निमकर, संतोष उरकुडे, रमेश करमनकर, सूरज गोरे यांचेसह मंडळाचे पदाधिकारी, संघर्ष क्रिकेट टीम, आयोजन समिती, समारंभ समिती चे सर्व पदाधिकारी तथा मंडळाचे सदस्यांनी परिश्रम घेतले. तसेच वेकोली पोवनी उपक्षेत्र प्रबंधन यांचे माध्यमातून कार्यालयीन सहकार्य लाभले. स्वागत गीत कु. प्रतिभा बोबडे, संचालन अमोल डेरकर तर आभार सचिव अँड. इंजि. प्रशांत घरोटे यांनी केले. स्पर्धेमध्ये 40 स्पर्धकांनी विविध गटात सहभाग नोंदविला. (aamcha vidarbha) (chandrapur) (rajura)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top