Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आध्यात्म अंगिकारून स्वत: मधिल सद्गुनांचा विकास करा - निलेश ताजणे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी कोरपना - (दि. ३ फेब्रुवारी २०२४) -         विश्वामध्ये आपण आहोत, आपणामध्ये विश्व आहे, तोच ख...

आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
कोरपना - (दि. ३ फेब्रुवारी २०२४) -
        विश्वामध्ये आपण आहोत, आपणामध्ये विश्व आहे, तोच खरा भगवंत आहे, असे अमुल्य वचन समाजाला देणारे संत फुलाजी बाबा यांचा वार्षिक महोत्सव नुकताच लोणी स्थानांवर पार पडला. यावेळी चंद्रपुर, यवतमाळ जिल्हा तथा तेलंगाना सिमेलगतच्या भागातुन मोठ्या प्रमाणात फुलाजी बाबा अनुयायी महोत्सवाला उपस्थित होते.

        आपल्या जिवन रचणेत आध्यात्मिक आधार ठेवल्यास अंतर्मुखी देहात भगवंत वास करतो. त्यासाठी ध्यानधारणा हे प्रभावी माध्यम आहे. आध्यात्म अंगिकारून आपण स्वत: मधिल सद्गुनांचा विकास करू शकतो, असे उद्बोधन युवा उद्योजक निलेश ताजणे यांनी साधकांना संबोधित करतांना केले. ते संत फुलाजी बाबा यांच्या वार्षिक महोत्सव कार्यक्रमात बोलत होते.

        दोन दिवसापासुन हा वार्षिक महोत्सव लोणी येथे चालु आहे. किर्तन, भजण, ग्रंथ वाचण यासारखे धार्मिक उपक्रम या महोत्सवात घेतले जातात. सकाळी गावात पालखी सोहळा काढण्यात आला, यावेळी पंचक्रोषितील भजण मंडळी व फुलाजी बाबा साधक बांधव, मातृशक्ति मोठ्या संख्येत सहभागी होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे कडुन पाठविण्यात आलेल्या श्रीराम मुर्ती वितरण सोहळा अनुलोम संस्थेच्या माध्यमातुन घेण्यात आला. बाबांचे सेवक तुकाराम दादा राठोड व बाबांचे साधक नथ्थु मालेकर यांना श्रीराम मुर्ती प्रदान करण्यात आली. ह.भ.प. डाखरे महाराज, सतिश धोटे, निलेश ताजणे, तुकाराम दादा राठोड, सुभाष वडस्कर, ह.भ.प पुजा ताई, दादाराव मागाळे, प्रकाश मागाडे, सतिश गुरूनुले इत्यादि मान्यवरांची संबोधने झाली.

        यावेळी अनुलोम समन्वयक सतिश मुसळे यांनी एकात्मता मंत्र व वेदमंत्र पठणाचा कार्यक्रम घेऊन अनुलोम संस्थेची कार्यरचणा रेखाटली. फुलाजी बाबा संस्थान लोणी अध्यक्ष गजानन वडस्कर, बंडु थेरे, मारोती मुसळे, ज्योतिराम लेनगुरे, चंपत सिडाम, बंडु चौधरी, बंडु नागोसे, शंकर लेनगुरे, देविदास काकडे, रामचंद्र दवंडे, दौलत सिडाम यांचे सह पंचक्रोषितील हजारो साधक बांधव, मातृशक्ति मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुर्लिधर नागोसे यांनी केले.
(aamcha vidarbha) (gadchandur) (korpana)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top