Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: "क्षय" रुग्णाना पोषक आहाराचे वितरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदूर भाजपाने दिला मदतीचा हाथ आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी गडचांदूर :  (दि. ३ फेब्रुवारी २०२४) -        देश्याचे पंतप...

गडचांदूर भाजपाने दिला मदतीचा हाथ
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर :  (दि. ३ फेब्रुवारी २०२४) -
       देश्याचे पंतप्रधान मा.नरेन्द्रजी मोदी यानी सन २०२५ पर्यंत देश्यातुन क्षय रोग मुक्त भारत करण्याचे ठरविले आहे. यात लोक सहभाग म्हणून समाजसेवी संस्था दानशुर व्यक्तींना आव्हान केले आहे. त्या दृष्टिकोनातून आरोग्य विभागाकडून क्षय रोग रुग्णाचे शोध घेवून त्याना उपचार चालू केला आहे. 

       परंतु सदर रुग्णाना औषधी सोबत पोषक आहार आवश्यक असतात परंतु क्षय रुग्णांची आर्थिक परिस्थिति हलाखिची असल्यासने ते पोषक आहार घेवू शकत नाही. तेव्हा कोरपणा तालुका आरोग्य अधिकारी स्वप्निल टेंम्भे यांनी क्षय रुग्णाना दत्तक घेवून सहा महीने पोषक आहार पुरविण्या करीता सामाजिक कार्यकर्त्यानी तसेच संस्थानी, राजकीय पक्ष्यानी पूढ़े यावे असे आव्हान केले होते. त्यांच्या आव्हानाची दखल घेत भारतीय जनता पार्टी गडचांदूर कडून शहरातील जेवढे रुग्ण निघतील ते सर्व रुग्ण दत्तक घेण्याचे ठरविले आहे. कोरपना तालुका आरोग्य विभागाने शोध घेतला असता आज पर्यंत १० रुग्ण आधळले त्यांना दिनांक २६ जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टी गडचांदुर कडून पोषक आहार किट चे वाटप करण्यात आले.

       यावेळी तालुका आरोग्य अधिकारी स्वप्निल टेंभे व त्यांची चमू तसेच भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष सतीश भाऊ उपलेंचवार, नगरसेवक अरविंद डोहे, रामसेवक मोरे, अरविंद कोरे, संदीप शेरकी, शिवाजी सेलोकर, अजीम बेग, विश्वंभर झाम, लींगुजी कांठले, गजानन शिंगरू, गंगाधर खंडाळे यादिंची उपस्थिती होती.
(aamcha vidarbha) (gadchandur)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top