Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जांबूळधरा येथे आमदार सुभाष धोटे यांनी केले विकास कामांचे भूमिपूजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी कोरपना (दि. १५ जानेवारी २०२४) -         कोरपना तालुक्यातील मांडवा ग्रामपंचायत मधील जांबूळधर...

आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. १५ जानेवारी २०२४) -
        कोरपना तालुक्यातील मांडवा ग्रामपंचायत मधील जांबूळधरा गावाला अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी अधिनियम २००६, नियम २००८ व सुधारित नियम २०१२ अन्वये  सामूहिक वन हक्क मिळाले आहेत. ३० कुटुंब संख्या असलेल्या या आदिवासी बहुल गावाला २०१८ मध्ये सर्वे नं. १४/१ मध्ये ६६३.९४ हे आर क्षेत्राचे सामूहिक वन अधिकार प्रपत्र मिळाले आहेत.(subhash dhote)
       सामूहिक वन हक्क प्राप्त गावे जंगलालगत असल्याने मूलभूत सोयी सुविधा पासून वंचित असल्याचे दिसून येते. परंतु वन हक्क कायदा २००६ सामूहिक वन हक्क प्राप्त गावांना विकासाच्या समान संधी प्राप्त करुन देत आहे. त्यामुळं समुदायाचे जीवनमान उंचावत आहे असे दिसून येते. या सर्व प्रक्रियेला अधिक गती प्राप्त व्हावी या करिता राजुरा विधानसभा मतदार संघाचे आमदार सुभाष धोटे यांनी दिनांक १५/०१/२०२४ जांबूळधरा ला जंगलातून गावाकडे निघणाऱ्या मोठया नाल्यावर गेटेड साठवण बंधारा अंदाजे ५१,५६,७९६ लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजन केले. यामुळे शेतीचे पाण्यामुळे होणारे मोठे नुकसान टळणार आहे. गावातील कुटुंबाना याचा फार मोठा फायदा होईल असा विश्वास मा. आमदार यांनी व्यक्त केला. सोबतच गावातील राजीव गांधी भवन, शेतातील विजेच्या खांबाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर मतदार संघातील इतर सर्व वनहक्क प्राप्त गावाच्या विकासकामांना आवश्यक ते सर्व सहकार्य करू असे आश्वासन देऊन सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना सूचना दिल्या. (aamcha vidarbha) (gadchandur) (korpana)





Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top