Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नारंडा येथे तीन अंकी नाट्यपुष्प संगीत 'थैमान' नाटकाचे उद्घाटन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सामाजिक तथा कौटुंबिक परिस्थितीवर भाष्य करणारा नाटक आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी गडचांदूर (दि. १५ जानेवारी २०२४) -       ...

सामाजिक तथा कौटुंबिक परिस्थितीवर भाष्य करणारा नाटक
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. १५ जानेवारी २०२४) -
        कोरपना तालुक्यातील मौजा नारंडा येथील नवयुवक नाट्यकला मंडळच्या वतीने आयोजित केलेल्या "तीन अंकी नाट्यपुष्प संगीत : थैमान" या सामाजिक तथा कौटुंबिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या नाटकाचे उद्घाटन केले.
        नाट्यरसिकांनी थैमान या सामाजिक तथा लावणीप्रधान कलाकृतीने बहरलेल्या नाटकाचा सकारात्मक आशय समजून घ्यावा, मनोरंजनात्मक दृष्टीकोनातून नाटकाचा आनंद घेत वाईट विचारांना येथेच त्यागावे अशी भावना या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी जि.प. अध्यक्ष आणि राजुरा विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे (Devrao Bhongle) यांनी मनोगतातून व्यक्त केली.
        यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार एड. संजय धोटे (Adv Sanjay Dhote), सरपंचा सौ. अनुताई ताजणे, निलेश ताजणे, भाजयूमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, पो. पा. नरेश परसुटकर, उपसरपंच बाळा पावडे, माजी सरपंच वसंत ताजने, दिलीप गिरसावळे, विनोद नरेन्दुलवार, माजी सरपंच सदाशिव पोटदुखे, वनोजाचे सरपंच दिलीप पाचभाई, तंमुस अध्यक्ष हिराजी वांढरे, ग्रा.पं. सदस्य अनिल शेंडे, मिलिंद ताकसांडे, वर्षा उपासे, रुपाली उरकुडे, शालू हेपट, मुख्याध्यापक गुंडावर सर, पत्रकार मनोज गोरे, मंडळाचे सचिव प्रवीण हेपट, सत्यवान चामाटे, नागोबा उरकुडे, प्रमोद शेंडे, गौरव वांढरे, वैभव गंगमवार यांचेसह नाट्यरसिकांची मोठी उपस्थिती होती. (aamcha vidarbha) (gadchandur)





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top