Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अज्ञात व्यक्तीने शेतात कापून ठेवलेला तुरीचा ढिगाला लावली आग
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जवळपास दोन लाख रुपयाचे आर्थिक नुकसान प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी करण्याची मागणी आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी कोरपना (दि...

जवळपास दोन लाख रुपयाचे आर्थिक नुकसान
प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी करण्याची मागणी
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. ८ जानेवारी २०२४) -
        नांदा येथील रहिवासी विलास नथुजी राजगडकर यांची मौजा काकडघाट येथे असलेल्या शेतातील कापून ठेवलेले तुरीचे ढीग अज्ञात व्यक्तीने जाळून राख केल्याची घटना काल रविवारी घडली. या घटनेत शेत मालकाचे जवळपास 2 लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झाले.

        प्राप्त माहितीनुसार काल रविवारी रात्रीला नांदा येथील रहिवासी विलास नथुजी राजगडकर यांची मौजा काकडघाट ता. राजुरा येथे शेत सर्वे क्रमांक 23 ही शेत जमीन आहे. सदर जमीनचे 5.23 हेक्टर क्षेत्रात यावर्षी कपाशी व तुरीची लागवड करून मागील 7 दिवसापासून तुरीची कापणी करून काल कापणी केलेली तुरीचे पेंड्या जमा करून एकत्रित ढिग केला होता. रविवार च्या रात्रीला अज्ञात इसमांकडून तुरीचा ढिगाला आग लावून संपूर्ण मालाची राखरांगोळी झाल्याने जवळपास 20 क्विंटल तुरीच्या पिकाचे नुकसान झाले. तुरीचा ढीग जाळला गेल्याने तूर व तुरी पासून होणारे कुटार असे जवळपास 2 लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झाले. शेत मालकाने दिलेल्या राजुरा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक त्यांच्या तुरीचा ठीग जाळून टाकला. जाळपोळ करणाऱ्या अज्ञात इसमाचा मोबाईल मुळे शोध घेता येऊ शकेल अशी शंका करत विलास राजगडकर ने राजुरा पोलिस ठाणेदाराना या प्रकरणाची जातीपूर्वक लक्ष देऊन उचित सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे. (aamcha vidarbha) (nanda phata)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top