Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सीमाभागात पिस्तूलसह एका आरोपीला अटक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पेट्रोलपंप दरोड्यानंतर पोलीस सतर्क आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. ९ जानेवारी २०२३) -         (petrol pump robbery) वरुड रोड परिसरातील ...

पेट्रोलपंप दरोड्यानंतर पोलीस सतर्क
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ९ जानेवारी २०२३) -
        (petrol pump robbery) वरुड रोड परिसरातील पेट्रोल पंपावर शनिवारी पहाटे एक लाख 90 हजार रुपयांचा एवज लुटण्याची घटना घडल्यानंतर राजुरा पोलीस सतर्क झाले असून पोलिसांनी अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांची शोध मोहीम सुरू केली आहे. राजुरा तालुका हा महाराष्ट्र-तेलंगणा सीमावर्ती भागात येत असल्याने रविवारी सायंकाळी सहा वाजता राजुरा पोलिसांना मोठ्या कारवाईत यश आले.. पोलिसांनी एका आरोपीला देशी बनावटीच्या पिस्तुलासह अटक केली आहे. आरोपी अजय माणिकराव देवगडे वय २४ राहणार पराधीगुडा (लक्कडकोट) याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना ही माहिती मिळतात त्यांनी त्याच्या घरावर छापा मारून त्याला पिस्तुलासह अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हाके, पोलीस हवालदार किशोर तुमराम, सुनील गौरकार आदींनी केली. (aamcha vidarbha) (rajura)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top