Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: JCI राजुरा रॉयल चा पदग्रहण सोहळा संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्वरूपा झंवर यांची अध्यक्षपदी निवड आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. ११ जानेवारी २०२३) - व्यक्तिमत्व विकास करिता नेहमी अग्रेसर ज्युनियर च...

स्वरूपा झंवर यांची अध्यक्षपदी निवड
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ११ जानेवारी २०२३) -
व्यक्तिमत्व विकास करिता नेहमी अग्रेसर ज्युनियर चेंबर ची शाखा जेसीआय राजुरा रॉयल चा दहावा पदग्रहण सोहळा स्थानिक पटवारी भवनात संपन्न झाला. यात अध्यक्षपदी जेसी स्वरूपा झंवर, सचिवपदी जेसी डॉ. मोनिशा पाटनकर तर ज्युनियर जेसी अध्यक्षपदी सिया झंवर यांनी पदभार स्वीकारला. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून माजी आमदार अँड. संजय धोटे (Adv.Sanjay Dhote), प्रमुख अतिथी म्हणून झोन अध्यक्ष JFA CA प्रतीक सारडा (CA Pratik Sarda), झोन उपाध्यक्ष JCI SEN जयेश पनपालिया (Jayesh Panpaliya), झोन उपाध्यक्षा सुषमा शुक्ला (Sushma Shukla), व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप जैन (Sandeep Jain), रोटरी क्लब चे अध्यक्ष कमल बजाज (Kamal Bajaj) यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. (JCI Rajura Royal) (Junior Chamber)

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी अध्यक्षा जेसी मधुस्मिता पाढी यांनी केले. जेसी मधुस्मिता पाढी (Madhusmita Padhi) यांनी त्यांच्या २०२३ अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील झालेले कार्यक्रम व उपक्रमांचा अहवाल प्रस्तुत केला तसेच नवनिर्वाचित जेसी अध्यक्ष स्वरूपा झंवर (Swarupa Zhanwar) याना शपथ, कॉलर, पिन देत पदभार सौपवला. नवनिर्वाचित अध्यक्षा झंवर यांनी महिलांतील नेतृत्वगुण पुढे येण्यास अधिकाधिक प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाही दिली. 

माजी आमदार अँड. संजय धोटे यांनी जेसिसच्या शैक्षणिक ट्रेनिंग, सामाजिक कार्याचे कौतुक करत सामाजिक कार्य करत असताना रॉयल ला कोणतेही सहकार्य लागत असल्यास मदतीचे आश्वासन दिले. प्रतीक सारडा यांनी नवीन अध्यक्षांना वर्षभर उत्तम कार्य करण्या करिता कोणतेही सहकार्य हवे असल्यास ते देण्याचे आश्वासन दिले. संचालन श्वेता जयस्वाल तर आभार डॉ. मोनिशा पाटनकर यांनी केले. यावेळी रॉयलच्या संस्थापक अध्यक्षा जयश्री शेंडे, स्मृती व्यवहारे, सुशीला पोरेड्डीवार, ज्योती मेडपल्लीवार, आशा चंदेल, राधा विरमलवार, सिमिति चौहान, प्रफुल्ला धोपटे तसेच जेसी सदस्य व गणमान्य नागरिक उपस्थित होते. (aamcha vidarbha) (rajura)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top